Friday, May 2, 2025

जागतिक दृक-श्राव्य मनोरंजन शिखर परिषदेत(वेव्हज 2025) ईशान्य भारतीय सिनेमासाठी ऐतिहासिक क्षण ठरणाऱ्या ‘ईशान्य भारतातील सिनेमाची आव्हाने आणि भवितव्य’ या शीर्षकाखाली एक पॅनेल चर्चेचे आयोजन

 




मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे आयोजित जागतिक दृक-श्राव्य मनोरंजन शिखर परिषदेत(वेव्हज 2025) ईशान्य भारतीय सिनेमासाठी ऐतिहासिक क्षण ठरणाऱ्या ‘ईशान्य भारतातील सिनेमाची आव्हाने आणि भवितव्य’ या शीर्षकाखाली एक पॅनेल चर्चेचे आयोजन करण्यात आले. या सत्रात या प्रदेशातील चित्रपट उद्योगातील काही महत्त्वाची व्यक्तीमत्वे एकत्र आली आणि त्यांनी येथील सळसळत्या चेतनादायी चित्रपट परिदृश्याचा आढावा घेतला.
या पॅनेलमध्ये जानू बरुआ, जतीन बोरा, रवी शर्मा, ऐमी बरुआ, हाओबम पाबन कुमार आणि डोमिनिक संगमा यांच्यासारखे नामवंत चित्रपट निर्माते आणि कलाकारांचा समावेश होता ज्यांच्यापैकी सर्वांनीच ईशान्येतील चित्रपट संस्कृतीला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

No comments:

Post a Comment

DIO NEWS 25-01-2026

  मंत्री दादाजी भुसे यांचा जिल्हा दौरा *प्रजासत्ताक दिनी करणार ध्वजारोहण अमरावती,   दि. 25 (जिमाका) : शालेय शिक्षण मंत्री दा...