Saturday, May 3, 2025

'ओटीटी रिव्होल्युशन: हाऊ एआय, पर्सनलायझेशन अँड इंटरअक्टिव्ह कंटेंट अ चेंजिंग स्ट्रीमिंग लॅन्डस्केप' या विषयावर चर्चासत्राचे आयोजन

 



ओटीटी विश्वात तंत्रज्ञान, वैयक्तिकरण आणि सर्जनशीलता यांचा संगम आता प्रेक्षकांच्या सवयी आणि पसंती बदलतो आहे, असे मत वेव्हज परिषदेत सहभागी झालेल्या आघाडीच्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

जिओ वर्ल्ड सेंटर येथील जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद - २०२५ मध्ये 'ओटीटी रिव्होल्युशन: हाऊ एआय, पर्सनलायझेशन अँड इंटरअक्टिव्ह कंटेंट अ चेंजिंग स्ट्रीमिंग लॅन्डस्केप' या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी लायनस्गेट प्ले एशियाचे अध्यक्ष रोहित जैन यांच्या सूत्रसंचालनाखाली झालेल्या या चर्चेत जिओ हॉटस्टारचे चीफ प्रोडक्ट ऑफिसर भरत राम, सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव बॅनर्जी, नेटफ्लिएक्स इंडियाचे उपाध्यक्ष (कन्टेन्ट) मोनिका शेरगिल, एशिया पॅसिफिक आणि मिनी प्राइम व्हिडिओचे उपाध्यक्ष गौरव गांधी, हंगामा डिजिटल मीडिया एंटरटेनमेंट लिमिटचे व्यवस्थापकीय संचालक नीरज रॉय यांनी सहभाग घेतला.

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...