Wednesday, May 28, 2025

DIO NEWS AMRAVATI 28-05-2025


 

                         जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन

अमरावती दि. 28 (जिमाका) : जिल्हाधिकारी कार्यालयात आज स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दानेज, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, जिल्हा खनिकर्म अधिकारी इब्राहिम शेख, अधिक्षक निलेश खटके, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

0000

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची संधी

अमरावती, दि. 28 (जिमाका) : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना संयुक्त संरक्षण सेवा (सीडीएस) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील नवयुवक व नवयुवतीसाठी दि. 16 जून ते 29 ऑगस्ट, 2025 या कालावधीत सीडीएस कोर्स क्र. 65 आयोजित करण्यात आला आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क व्यवस्था करण्यात आली आहे.

            अमरावती जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाच्या संधीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अमरावती  येथे दि. 5 जून, 2025 मुलाखतीस हजर रहावेत. मुलाखतीस येते वेळी  Department of Sainik Welfare, Pune (DSW) या वेबसाईटवर सर्च करुन त्यामधील सीडीएस-65 कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरुन सोबत घेऊन यावे.

            केंद्रामध्ये सी.डी.एस. कोर्समध्ये प्रवेश मिळण्यासाठी खाली नमूद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येताना सोबत घेऊन यावेत.

अ) उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. आ) उमेदवार लोकसंघ आयोग (UPSC) नवी दिल्ली यांचे मार्फत घेण्यात येणाऱ्या सी. डी. एस. (CDS) या परीक्षेसाठी ऑनलाईन व्दारे अर्ज केलेला असावा.   

             अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ई-मेल आयडी- training.pctcnashik@gmail.com व दूरध्वनी क्र. 0253-2451032 किंवा व्हॉट्ॲप क्र. 9156073306 प्रवेशपत्र मिळण्यासाठी असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर आनंद पाथरकर यांनी केले आहे.

 

00000

अमरावती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात तात्पुरत्या नियुक्तीची संधी

अमरावती, दि. 28 (जिमाका): अमरावती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात तात्पुरत्या नियुक्तीची संधी प्राप्त होणार आहे. तरी इच्छुक पात्र माजी सैनिक,  वीर पत्नी तसेच नागरिकांनी मुलाखत व इतर परीक्षेसाठी  सोमवार, दि. 2 जून 2025 रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कॅम्प, अमरावती येथे प्रत्यक्ष हजर राहावे. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

अमरावती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात येथे ऑनलाईन ई ऑफिस बाबत कार्यवाही, महाडीबीटी पोर्टलमध्ये माहिती भरणे तसेच इतर कार्यालयीन कामकाजासाठी  निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात रोजंदारी तत्वावर एकूण 2 (माजी सैनिक, वीर पत्नी, इतर नागरिक या प्रवर्गातून) उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार आहे. यासाठी शिक्षण इयत्ता 12 वी पास तसेच संगणकाचे पूर्ण ज्ञान असणे आवश्यक असून वयोमर्यादा 18 ते 40 वर्षापर्यंत आहे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र. 0721-2661126 येथे संपर्क साधावा.

00000

 दहावी आणि बारावीच्या वि‌द्यार्थ्यांसाठी मनोवैज्ञानिक कसोट्या आणि करिअर मार्गदर्शन

अमरावती, दि. 28 (जिमाका): दहावी आणि बारावीच्या वि‌द्यार्थ्यांना मनोवैज्ञानिक कसोट्या आणि करिअर मार्गदर्शन नि:शुल्क उपलब्ध करुन देण्यात येत आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, टोपे नगर येथे मानसशास्त्रीय कसोट्या  आणि करिअर मार्गदर्शन सुविधा उपलब्ध असून जिल्ह्यातील 27 वि‌द्यार्थ्यांनी आतापर्यंत याचा लाभ घेतलेला आहे. या कसोट्‌यांचा उद्देश वि‌द्यार्थ्यांच्या बौ‌द्धिक क्षमता, अभिरुची, व्यक्तिमत्त्व आणि करिअर निवडीसाठी योग्य मार्गदर्शन करणे हा आहे. सर्व वि‌द्यार्थ्यांनी व पालकांनी या संधीचा लाभ घ्यावा. ही सेवा नि:शुल्क असून वि‌द्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.

 अधिक माहितीसाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण सस्थाचे अधिव्याख्याता डॉ. विकास गावंडे टोपे नगर, मालटेकडी रोड, अमरावती मोबाईल न. 9421675540,  ईमेल-dietamravati@gmail.com  अधिकृत संकेतस्थळ www.dietamravati.com येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थाचे प्राचार्य मिलिंद कुबडे यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...