Wednesday, May 7, 2025

DIO NEWS AMRAVATI 07-05-2025

 





जिल्ह्यात गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेतील कामाला वेग

*जिल्हाधिकाऱ्यांचे लाभ घेण्याचे आवाहन

अमरावती, दि. 7 : शासनाची महत्वाकांक्षी गाळमुक्त धरण, गाळमुक्त शिवार योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. ही योजना शेतजमिन सुपीक करणे आणि धरणातील पाणीसाठा वाढवणे, यासाठी उपयुक्त असल्याने शासनस्तरावर जाणीवपूर्वक राबविल्या जात आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.

चांदुररेल्वे तालुक्यातील सोनगाव आणि शिवणी येथे सुरू असलेल्या कामांना जिल्हाधिकारी सौरभ कटियार, तहसीलदार पुजा माटोडे, पाटबंधारे उपविभागीय अभियंता पी. जी. दातीर, प्रकल्प अभियंता वसंतराव पांडव यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी अमोल आमले, प्रवीण गावंडे, दिनेश आमले, प्रशांत शिरफाते, तलाठी श्री. नादणे, विजय येडे, गजानन राऊत, प्रमोद राऊत, हर्षल वानखडे, आषिश गावंडे, श्री. लव्हाळे, किशोर बैशवार, निलेश सौसाकडे, अक्षय जामदार, अक्षय भेंडे, अक्षय फत्तेपूरे आदी उपस्थित होते

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज चिरोडी, ता. चांदुर रेल्वे येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या चिरोडी पाणीपुरवठा योजनेची पाहणी करून पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेतला. चांदुररेल्वे गटसाधना केंद्र येथील पिपल्स कला मंचच्या नाट्य अभिनय व्यक्तिमत्व विकास शिबिरास भेट देऊन मार्गदर्शन केले. तसेच चांदुर रेल्वे तहसील कार्यालय येथे सर्व विभाग प्रमुखांची कामाचा आढावा घेतला.

जिल्हा परिषदेंतर्गत अंबापूर, ता. चांदुररेल्वे येथील जलयुक्त शिवारच्या कामास भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर निंभा, ता. चांदुररेल्वे येथील विठाई चॅरिटेबल ट्रस्टच्च्या आरओ प्लॉन्टचे उद्घाटन केले. तसेच नदी पुनर्जीवन अंतर्गत तयार केलेल्या पुलाचे उद्घाटन करून मार्गदर्शन केले. शेंदूरजना खुर्द येथील सिमेंट नाला बांधकामाची पाहणी केली.

श्री. कटियार यांनी तहसील कार्यालय धामणगाव रेल्वे येथे सर्व विभाग प्रमुखांच्या कामाचा आढावा घेतला. तसेच धामणगाव रेल्वे येथे आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबाना शिधा पत्रिका वाटप, तसेच कोलाम समाजातील लोकांना गोल्डन कार्ड व जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. त्यानंतर मंगरूळ दस्तगीर, ता. धामणगाव रेल्वे येथील मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पाची कामाची पाहणी केली. तसेच चिंचपूर ता. धामणगाव रेल्वे येथील जलयुक्त शिवार अंतर्गत नाला खोलीकरण कामाची पाहणी करण्यात आली.

0000000

आज आंबा, मिलेट महोत्सवाचे उद्घाटन

अमरावती, दि. 7 : राज्य कृषि पणन मंडळातर्फे उत्पादक ते ग्राहक थेट विक्रीसाठी आंबा व मिलेट तृणधान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे उद्घाटन गुरूवार, दि. 8 मे रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात येणार आहे.

सदर महोत्सव दि. 8 ते दि. 12 मे दरम्यान सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत जाधव पॅलेस, बडनेरा रोड येथे होणार आहे. कोकणातील हापूस आंबा, विदर्भ-मराठवाड्यातील केशर आंबा, स्थानिक गावरान आंब्यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी राज्य कृषी उत्पन्न मंडळामार्फत महोत्सव आयोजित करून बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येते. तसेच मिलेट धोरणानुसार ज्वारी, बाजरी, भगर, नाचणी आदी मिलेट्सला बाजारपेठ उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न करण्यात येते. तृणधान्य उत्पादक, प्रक्रियामध्ये कार्यरत बचतगट, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि विविध संस्था सहभागी होणार आहेत. विक्री व्यवस्थेतील मध्यस्थाची संख्या कमी करून शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव आणि ग्राहकांना योग्य दरात चांगल्या गुणवत्तेचा शेतमाल मिळावा, यासाठी हा महोत्सव घेण्यात येत आहे.

यावर्षीच्या महोत्सवात उत्पादक आणि कंपन्यांचे 40 स्टॉल आहे. या महोत्सवासाठी पणन मंत्री जयकुमार रावल, कार्यकारी संचालक संजय कदम, सरव्यवस्थापक विनायक कोकरे यांनी मार्गदर्शन केले आहे. महोत्सवाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक दिनेश डागा यांनी केले आहे.

00000

जिल्हाधिकारी कार्यालयातील निर्लेखित वस्तूंचा लिलाव

अमरावती, दि. 7 : जिल्हाधिकारी कार्यालयातील निर्लेखित करण्यात आलेले फर्निचर, लाकडी लोखंडी खुर्चींचा लिलाव करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी दि. 14 मे पर्यंत निविदा सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जुन्या निर्लेखित शासकीय कालबाह्य झाालेल्या विविध प्रकारच्या 237 खुर्च्या जाहिर लिलावाद्वारे विक्री करण्यात येणार आहे. सदर साहित्य हे आहे, त्या स्थितीमध्ये विक्री करण्यात येणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती जिल्हा प्रशासनाच्या amravati.nic.in संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. खरेदी करू इच्छिणाऱ्यांनी साहित्य पाहून निविदेत सहभागी व्हावे, असे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंदा दाणेज यांनी केले आहे.

000000

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा

अमरावती, दि. 7 : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवार, दि. 8 मे रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

दौऱ्यानुसार, उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे गुरुवारी दुपारी 2.20 वाजता अमरावती विमानतळ येथे आगमन होईल. त्यानंतर दुपारी 2.30 वाजता शिवसेना पक्षाच्या मेळाव्याला मार्गदर्शन करतील. त्यानंतर दुपारी 3.30 वाजता वरुण मालू यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देतील. सायंकाळी 4 वाजता शासकीय विश्रामगृह येथे राखीव. सायंकाळी 5 वाजता श्री अंबादेवी आणि श्री एकवीरा देवीचे दर्शन घेतील. सायंकाळी 6 वाजता रेवसा येथील बाळकृष्णधाम इस्कॉन मंदिर भूमिपूजन, हस्तांतरण आणि स्व. प्रविण आणि प्रणव मालू स्मृती प्रवेशद्वाराच्या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित राहतील. त्यानंतर सायंकाळी 7 वाजता रेवासा येथून नागपूर विमानतळाकडे प्रयाण करतील.

000000

मंत्री डॉ. उदय सामंत यांचा दौरा

अमरावती, दि. 7 : उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत गुरुवार, दि. 8 मे रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

दौऱ्यानुसार, मंत्री श्री. सामंत यांचे गुरुवारी दुपारी 12.30 वाजता अमरावती विमानतळ येथे आगमन होईल. त्यानंतर दुपारी 12.45 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात उद्योजकांच्या अडचणीसंदर्भात औद्योगिक संघटना आणि उद्योजकांसमवेत बैठक, पीएम मित्रा आढावा बैठक आणि दुपारी 1.30 वाजता मराठी भाषा विभागाची आढावा बैठक घेतील. दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद घेतील.

त्यानंतर दुपारी 2.30 वाजता परिसंवाद व कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थित राहतील. शासकीय विश्रामगृह येथे राखीव. सायंकाळी 5 वाजता श्री अंबादेवी आणि श्री एकवीरा देवीचे दर्शन घेतील. सायंकाळी 6 वाजता रेवसा येथील इस्कॉन वैदिक सांस्कृतिक केंद्राच्या भूमी दान एवं भूमिपुजन सोहळ्यास उपस्थित राहतील. त्यानंतर सायंकाळी 7 वाजता रेवासा येथून नागपूर विमानतळाकडे प्रयाण करतील.

000000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...