बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील वर्ल्ड जिओ सेंटर येथे ‘ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट’ (वेव्हज – २०२५) निमित्त उभारण्यात आलेल्या भारत पॅव्हेलियनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली.
भारत पॅव्हेलियनमध्ये हरियाणा, पंजाब, राजस्थान, मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा,गोवा राज्यांचे पॅव्हेलियन उभारण्यात आले आहेत. याशिवाय करमणूक क्षेत्रातील नेटफ्लिक्स, जिओ, यू ट्यूब, मेटा,स्टार्टअप, विविध मनोरंजन आणि वृत्त वाहिन्या, चित्रपट निर्मिती संस्थाचे पॅव्हेलियन उभारण्यात आले आहेत.
सर्जनशीलता, सुसंवाद आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन आणि येणाऱ्या काळात या क्षेत्रात भारताची भविष्यातील कशी वाटचाल याचे दर्शन भारत पॅव्हेलियनला मध्ये पाहायला मिळत असल्याचे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.
#CreateInIndiaChallenge
#WAVES2025
#WAVES
#WAVESIndia
#WAVESummit
#WAVESummitIndia

No comments:
Post a Comment