Saturday, May 3, 2025

‘वेव्हज् परिषदे’मध्ये ‘चित्रपट निर्मितीमध्ये एआय कसे परिवर्तन घडवित आहे’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन

 





कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) टूल्सचा आता प्रत्येक क्षेत्रात वापर होत आहे. एआय टूल्स शिकण्यास अतिशय सोपे असून यापुढे प्रत्येक क्षेत्रात त्याचा वापर केल्यास आपल्या क्षेत्रात काम करणे सोपे जाईल, असे मत चित्रपट निर्मितीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणाऱ्या निर्मात्यांच्या चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले.

जिओ वर्ल्ड सेंटर येथे आयोजित ‘वेव्हज् परिषदे’मध्ये ‘चित्रपट निर्मितीमध्ये एआय कसे परिवर्तन घडवित आहे’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या चर्चासत्रात व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनलचे उपाध्यक्ष चैतन्य चिंचलीकर, न्यूरल गॅरेजचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार नाटेकर, चित्रपट निर्माता राघवेंद्र नाईक यांनी सहभाग घेतला.

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 11-03-2026

  दिव्यांग लाभार्थ्यांच्या मानधनात हजार रुपयांची वाढ; 20 मार्चपूर्वी युडीआयडी आणि आधार अपडेट करण्याचे आवाहन अमरावती, दि. 11 (जिमाका):   राज्...