निराधार, श्रावणबाळचे पैसे तात्काळ वितरीत करावेत
-उपमुख्यमंत्री अजित पवार
अमरावती, दि. ४ : संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना केंद्राच्या निधीची वाट पाहू नये. राज्याने निधी तातडीने वितरीत करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
श्री. पवार यांनी मनेरगा आणि इतर योजनांच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारच्या हिश्याच्या निधीची वाट पाहण्यात येते. मात्र यामुळे लाभार्थ्यांना लाभ मिळण्यास उशिर होत आहे. त्यामुळे केद्राच्या निधी वाट न पाहता लाभार्थ्यांच्या बँक खात्यात लाभ जमा करावा. डीबीटीमध्ये अडचणी येत असल्यास तातडीने आधार जोडणी करावी. निधी देण्यासाठी ३१ मार्च मूदत होती. त्यामुळे निधीचे तातडीने वितरण करावे.
स्वस्त धान्य योजनेतून पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांचा शोध घेवून अंत्योदयचा लाभ देण्यात यावा. धान्य वितरीत करताना मेळघाट परिसरातील आदिवासींना धान्य प्राधान्याने वितरीत करण्यात यावे. जिल्हा नियोजनमधून पोलिसांना निधी देण्यात येत असून त्यामधून पोलिसांना आवश्यक असणारी वाहने आणि इतर साहित्य देण्यात यावे. यासोबतच गेल्या शंभर दिवसांच्या कृती आराखड्यामध्ये चांगले काम होत आहे. यात सातत्य टिकवावे. यातून चांगले काम होईल, यासाठी लक्ष देण्यात यावे. जिल्हा नियोजनमधून करण्यात येणारी कामे वेळेत मंजुरी घ्यावी. तसेच ही कामे डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात यावे.
अमरावती विमानतळाची धावपट्टी वाढवणे आणि या ठिकाणी रात्री विमान उतरण्याची सोय करण्यासाठी निधी उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे ही कामे तातडीने होण्यासाठी लक्ष द्यावे. सारथीच्या इमारतीसाठी जागा आणि निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे येत्या जून 2026 पर्यंत बांधकाम पूर्ण करावे. तसेच या ठिकाणी उत्कृष्ट सोयी सुविधांसह भोजन व्यवस्था आणि वाहनतळाची व्यवस्था असावी. तसेच कामगारांना राहण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी असे निर्देश श्री पवारांनी दिले.
000000
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment