Friday, May 16, 2025

DIO NEWS AMRAVATI 16-05-2025

 

अॅड. धर्मपाल मेश्राम यांचा दौरा

अमरावती, दि. 16 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य तथा उपाध्यक्ष अॅड. धर्मपाल मेश्राम यांचा मंगळवार, दि. 20 मे रोजी अमरावती जिल्हा दौरा आहे.

दौऱ्यानुसार, दि. 20 मे रोजी शासकीय विश्रामगृह येथे आगमन. सकाळी 11 वाजता मुख्याधिकारी अंजनगाव यांचेसोबत आढावा व कामाची पाहणी. भेटी व तपासणी. दुपारी 12 वाजता मुख्याधिकारी चांदूरबाजार यांचेसोबत आढावा व कामाची पाहणी. भेटी व तपासणी. दुपारी 1 वाजता मुख्याधिकारी चिखलदरा यांचेसोबत आढावा व कामाची पाहणी. भेटी व तपासणी. दुपारी 2 ते 3 राखीव. त्यानंतर अमरावती येथून सोयीने नागपूरकडे रवाना.

00000

कौशल्य विकास केंद्राचा मंगळवारी रोजगार मेळावा

अमरावती, दि. 16 (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मोहिमे’चे मंगळवार, दि. 20 मे 2025 रोजी आयोजन करण्यात आले आहे. शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, उस्मानिया मशिदीजवळ, डेपो रोड, अमरावती येथे हा मेळावा होणार आहे.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडल करिअर सेंटरतर्फे रोजगार मेळाव्याचे आयोजन  करण्यात आले आहे. मेळाव्यामध्ये विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. जिल्ह्यातील युवकांना नोकरीच्या संधी मिळवून देण्यासाठी रोजगार मेळाव्यामधून प्रयत्न करण्यात येतो. मेळाव्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी विविध आस्थापना, कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतील. मुलाखतीनंतर पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे.

मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी mahaswayam.gov.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी. यात ऑनलाईन सहभाग नोंदवून आपली रजिट्रेशनची प्रत काढून मेळाव्याच्या दिनांकास उपस्थित राहावे. याबाबत अडचणी असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, दुरध्वनी क्रमांक 0721-2566066 किंवा amravatirojgar@gmail.com या मेलवर संपर्क साधावा. मेळाव्यासाठी बायोडाटा, पासपोर्ट साईज फोटो आणि आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

0000000

सोमवारी महिला लोकशाही दिन

अमरावती, दि. 13 (जिमाका) : जिल्हाधिकारी कार्यालयात महिला लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, दि. 19 मे रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आले आहे. महिलांनी त्यांच्या तक्रारी विहित नमुन्यात व आवश्यक कागदपत्रांसह सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

00000

वस्त्रोद्योग प्रधान सचिव अंशु सिन्हा यांची भेट

अमरावती, 16 : वस्त्रोद्योग विभागाच्या प्रधान सचिव अंशु सिन्हा यांनी आज नांदगाव पेठ येथील पीएम मित्रा टेक्सटाईल पार्क आणि बडनेरा येथील राज्य रेशीम पार्कला भेट दिली.

नांदगाव पेठ येथील पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कमधील कामाची पाहणी अंशु सिन्हा यांनी केली. यावेळी जिल्हाधिकारी सौरभ कटियार, वस्त्रोद्योग विभागाचे उपसचिव श्रीकृष्ण पवार, रेशीम संचालनालयाचे संचालक विनय मुन, वस्त्रोद्योग आयुक्त संजय देने, वस्त्रोद्योग विभागाचे उपसचिव गणेश वंडकर, सहाय्यक आयुक्त हेमंत लाडगांवकर, तहसिलदार विजय लोखंडे उपस्थित होते.

त्‍यानंतर श्रीमती सिन्हा यांनी बडनेरा येथील राज्य रेशीम पार्कमध्ये तुती व टसर रेशीम शेतीची पाहणी केली. यावेळी रेशीम शेतीत नियोजित कामांबाबत सूचना दिल्या. तसेच राज्य रेशीम पार्कमध्ये टसरचे वृक्षारोपण करण्यात आले.

श्रीमती सिन्हा यांनी राज्य रेशीम पार्कमधील रिक्त पदांविषयी चर्चा केली. अधिकारी व कर्मचाऱ्यांची भरती करण्यासंदर्भात चर्चा केली. त्यांनी राज्य रेशीम पार्कमधील कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.

000000


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...