Friday, May 2, 2025

भाषा कुठलीही असो,चित्रपटात जर मानवी भाव-भावना,सहज सुंदर अभिनय व भारतीय संस्कृतीचे दर्शन घडले तर तो प्रेक्षकांच्या हृदयाला भिडतो.

 



देशात विविध भाषा,जाती,धर्माचे नागरिक राहतात. भाषा कुठलीही असो,चित्रपटात जर मानवी भाव-भावना,सहज सुंदर अभिनय व भारतीय संस्कृतीचे दर्शन घडले तर तो प्रेक्षकांच्या हृदयाला भिडतो. भाषा, प्रेक्षक कोणतेही असले तरी तो भारतीय सिनेमा असतो हे महत्वाचे असे मत दाक्षिणात्य कलाकरांनी व्यक्त केले.
जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषदेमध्ये आयोजित 'पॅन इंडियन सिनेमा माइथ ऑर मोमेंटम' या विषयावर चर्चासत्र झाले. चर्चासत्रात ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर, दाक्षिणात्य अभिनेते नागार्जुन, कारथी, अभिनेत्री खुशबू सुंदर यांनी सहभाग घेतला तर त्यांना नमन रामचंद्रन यांनी बोलते केले.

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 11-03-2026

  दिव्यांग लाभार्थ्यांच्या मानधनात हजार रुपयांची वाढ; 20 मार्चपूर्वी युडीआयडी आणि आधार अपडेट करण्याचे आवाहन अमरावती, दि. 11 (जिमाका):   राज्...