Saturday, May 3, 2025

नॅशनल फिल्म अर्काइव्ह ऑफ इंडिया (एनएफएआय) आणि इमेजनेशन स्ट्रीट आर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘फिल्म पोस्टर मेकिंग चॅलेंज’ स्पर्धेचे आयोजन

 





जिओ वर्ल्ड सेंटर येथील जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद, २०२५ मध्ये नॅशनल फिल्म अर्काइव्ह ऑफ इंडिया (एनएफएआय) आणि इमेजनेशन स्ट्रीट आर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘फिल्म पोस्टर मेकिंग चॅलेंज’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेतील विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
डिजिटल पोस्टर्स स्पर्धेसाठी ५४६ प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी सर्वोत्तम ५० पोस्टर्स 'क्रिएटोस्फेअर्स'मध्ये प्रदर्शित करण्यात आले आहेत. तर हँड-पेंटेड पोस्टर्ससाठी, २ मे रोजी चार संस्थांमधील १० अंतिम स्पर्धकांनी प्रत्यक्ष रंगकाम करत स्पर्धेत सहभाग नोंदवला.
हँड-पेंटेड फिल्म पोस्टर्स स्पर्धेतील विजेत्यांची नावे
सुवर्ण पदक – दृश्या ए. (फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे)
रौप्य पदक – आदिशा ग्रोव्हर (कॉलेज ऑफ आर्ट, दिल्ली विद्यापीठ)
कांस्य पदक – तमन्ना सूरी (चितकारा युनिव्हर्सिटी, पंजाब)
डिजिटल फिल्म पोस्टर्स स्पर्धेतील विजेत्यांची नावे
सुवर्ण पदक – सुरेश डी. नायर (कोची)
रौप्य पदक – सप्तसिंधु सेनगुप्ता (कोलकाता)
कांस्य पदक – शिवांगिनी सर्मा कश्यप (आसाम)


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...