Saturday, May 3, 2025

‘मॅजिकल महाराष्ट्र’ या नावाने संपूर्णतः डिजिटल स्वरूपात उभारलेल्या महाराष्ट्राच्या दालनाने येथे भेट देणाऱ्या प्रेक्षकांवर अक्षरशः जादू केली आहे

 




वेव्हज २०२५ मध्ये ‘मॅजिकल महाराष्ट्र’ या नावाने संपूर्णतः डिजिटल स्वरूपात उभारलेल्या महाराष्ट्राच्या दालनाने येथे भेट देणाऱ्या प्रेक्षकांवर अक्षरशः जादू केली आहे. या दालनाचे त्रिमितीमधील डिजिटल प्रवेशद्वार आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराची शानदार झलक दाखवित आहे.

हे दालन खास करून मराठी चित्रपटांना समर्पित करण्यात आले आहे. गाजलेल्या मराठी चित्रपटांची माहिती येथे आधुनिक स्वरूपात प्रदर्शित करण्यात आली असून महाराष्ट्राच्या समृद्ध मनोरंजन वारशाची ही जादुई झलक मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये ऐकण्यासाठीसुद्धा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यामध्ये चित्रपटसृष्टीच्या प्रारंभापासून आजच्या गेमिंग आणि डिजिटल त्क्रांतीपर्यंतचा मनोहारी प्रवास, नावाजलेले स्टुडिओज, मनोरंजन उद्योगात होत असलेल्या नाविन्यपूर्ण कल्पनांमधील बदलांचा वेध घेण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

DIO NEWS 25-01-2026

  मंत्री दादाजी भुसे यांचा जिल्हा दौरा *प्रजासत्ताक दिनी करणार ध्वजारोहण अमरावती,   दि. 25 (जिमाका) : शालेय शिक्षण मंत्री दा...