Tuesday, June 3, 2025

DIO NEWS AMRAVATI 03-06-2025

महाडीबीटी शिष्यवृत्ती अर्जांसाठी १५ जूनपर्यंत मुदतवाढ 

     अमरावती, दि. ३ (जिमाका) : माहिती व तंत्रज्ञान विभागातर्फे सन २०२४-२५ वर्षातील महाडीबीटी पोर्टलवर अनुसूचित जाती प्रवर्गातील नवीन व नूतनीकरणाचे अर्ज सादर करण्यासाठी अंतिम मुदत १५ जून २०२५ पर्यंत करण्यात आली आहे.

  डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चांदूर रेल्वे रोड, अमरावती येथील सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाने सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती योजनांसाठी तसेच सन २०२३-२४ करिता Re-Apply करण्याची अंतिम मुदत १५ जून २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
या संदर्भात, ऑनलाइन नूतनीकरण आणि विहित मुदतीत अर्ज भरण्यासाठी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर त्वरित कार्यवाही करावी. तसेच, विद्यार्थ्यांनी केलेली त्रुटीपूर्तता करून "SEND BACK" केलेले अर्ज संबंधित महाविद्यालयांनी त्वरित त्रुटीपूर्तता करून जिल्हा लाईनवर पाठवावेत. 

    जिल्ह्यातील महाविद्यालय , महाविद्यालयांना नूतनीकरणाचे अर्ज भरण्याचे तसेच Re-Apply करण्याचे आणि SEND BACK केलेले अर्ज त्रुटीपूर्तता करून भरण्याचे आवाहन सहायक आयुक्त  राजेंद्र जाधव यांनी केले आहे.
           ****


जवाहर नवोदय विद्यालयातील प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरु

      अमरावती, दि. 3 (जिमाका ): जवाहर नवोदय विद्यालय,अमरावती मध्ये शैक्षाणिक सत्र 2026-27 करिता इयत्ता सहावीत प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी नवोदय विद्यालय समितीच्या संकेतस्थळावर www.navodaya.gov.in किंवा https://cbseitms.rcil.gov.in/nvs वर निःशुल्क अर्ज सादर करू शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 29 जुलै 2025 पर्यंत आहे.  प्रवेश परीक्षा दि. 13 डिसेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात येणार आहे.

   प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थी अमरावती जिल्ह्यातील रहिवासी असावा. तसेच जिल्ह्यातील मान्यता प्राप्त शाळेतून सत्र 2025 -26 मध्ये वर्ग पाचवीत अध्ययनरत असावा. अर्ज करताना विद्यार्थ्यांने स्वतःच्या आधारकार्ड क्रमांकाने अर्ज करावा. ज्या विद्यार्थ्यांची शाळा नगरपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका किंवा महानगरपालिका क्षेत्रात येत असेल त्यांनी शहरी विभागातून अर्ज करावेत. विद्यार्थ्यांचा जन्म 1 मे 2014 ते 31 जुलै 2016 दरम्यान असावा. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी नवोदय विद्यालय समितीच्या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्राचार्यांशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे .

                     *****

अचलपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांचे वसतिगृह येथे प्रवेश प्रक्रिया सुरु

     अमरावती, दि. 3 (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, अचलपूर येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मागासवर्गीय प्रवर्गनिहाय रिक्त असणाऱ्या आरक्षित जागांनुसार समाजातील अनु.जाती, अनु.जमाती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, अपंग व अनाथ आदी प्रवर्गातील विद्यार्थी प्रवेशास पात्र आहेत. शालेय विभागातील इयत्ता ८ वी, कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता ११ वी, बिगर व्यावसायिक महाविद्यालय व व्यावसायिक महाविद्यालयातील प्रथम वर्षातील प्रवेशासाठी विद्यार्थी अर्ज भरण्यास पात्र आहेत.

     प्रवेश अर्ज शासकीय वसतिगृहाच्या https://hmas.mahait.org या ऑनलाईन पोर्टलवर विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृह प्रवेश अर्ज भरता येईल. या अनुषंगाने जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज सादर करावे, जेणेकरून शासनाकडून मिळणाऱ्या सोयी-सुविधांचा लाभ विद्यार्थ्यांना घेता येईल. संबंधितांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन शासकीय वसतिगृहाचे गृहपाल यांनी केले आहे.
           ****

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...