Wednesday, June 25, 2025

DIO NEWS AMRAVATI 25.06.2025










 

सरन्यायाधीश न्या. भूषण गवई यांचे आगमन

अमरावती, दि. 25 (जिमाका) : सरन्यायाधीश न्या. भूषण रामकृष्ण गवई यांचे आज अमरावती विमानतळ येथे आगमन झाले. यावेळी उपस्थितांनी त्यांचे स्वागत केले.

सरन्यायाधीश न्या. श्री. गवई यांच्या स्वागतासाठी खासदार बळवंत वानखडे, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, माहिती आयुक्त रवींद्र ठाकरे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, मनपा आयुक्त सौम्या शर्मा, पोलीस अधीक्षक विशाल आनंद, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र उपस्थित होते. त्यांनी विमानतळावर सरन्यायाधीश न्या. श्री. गवई यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. विभागीय आयुक्त श्रीमती सिंघल यांनी लाकडावर कोरीवकाम केलेली भारताचे संविधान उद्देशिका भेट दिली.

00000























आणिबाणीतील मानधनधारकांच्या कायम पाठीशी

-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

*जिल्हास्तरीय प्रदर्शनाचे उद्घाटन, सन्मानपत्राचे वितरण

अमरावती, दि. 25 (जिमाका) : आणिबाणीच्या घटनेला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आज कार्यकर्त्यांशी संवाद साधता आला. येत्या काळात आणिबाणीतील प्रत्येक नागरिकाशी सविस्तर चर्चा करण्यात येईल. तसेच प्रशासनाकडे काही समस्या असल्यास भेट घ्यावी. या समस्या निकाली काढण्यासाठी आणिबाणीतील मानधनधारकांच्या कायम पाठीशी असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले.

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दानेज, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपसंचालक (माहिती) अनिल आलुरकर, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, प्रसेनजित चव्हाण, ज्ञानेश्वर घ्यार, तहसिलदार विजय लोखंडे, प्रशांत पडघन, अधिक्षक निलेश खटके यांच्यासह आणिबाणीतील मानधनधारक उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने देशातील 1975 ते 1977 दरम्यान आणिबाणी काळातील छायाचित्रांचे प्रदर्शन जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनीचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांच्या हस्ते आज फित कापून करण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी यांच्या हस्ते आणिबाणीतील मानधनधारकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र वितरीत करण्यात आले.

आणिबाणी काळात नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर मर्यादा आल्या आणि प्रसारमाध्यमांवर सेन्सॉरशिप लादली गेली. याबाबत आवाज उठवणाऱ्या अनेक व्यक्तींना तुरुंगवास झाला. यानिमित्ताने जिल्हा प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी यांच्या हस्ते आणिबाणीतील मानधनधारक यांचा सन्मान करण्यात आला. भावना जिचकार यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

00000

मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात

शैक्षणिक सत्रासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

अमरावती, दि. 25 (जिमाका): मागासवर्गीय मुलींसाठी असलेल्या विविध शासकीय वसतिगृहांमध्ये शैक्षणिक सत्र 2025-26 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. कनिष्ठ महाविद्यालयीन, अव्यावसायिक महाविद्यालयीन आणि व्यावसायिक महाविद्यालयीन विभागातील इच्छुक विद्यार्थिनींना या वसतिगृहांमध्ये प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह युनिट क्र. 4, जेल रोड, अमरावती, मागासवर्गीय गुणवंत मुलींचे शासकीय वसतिगृह, जेल रोड, अमरावती, मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, कॅम्प रोड, अमरावती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त मुलींचे शासकीय वसतिगृह, विलासनगर, राम लक्ष्मण संकुल, अमरावती या वसतिगृहांमध्ये प्रवेशाची प्रक्रिया सुरु आहे.

प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थिनींनी https://hmas.mahait.org या ऑनलाईन पोर्टलवर अर्ज भरायचा आहे. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर, तो अर्ज डाउनलोड करून त्याची प्रिंट काढणे आवश्यक आहे. या प्रिंटेड अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे संबंधित वसतिगृहात जमा करावी लागतील. अधिक माहितीसाठी, विद्यार्थिनींनी संबंधित वसतिगृहांशी संपर्क साधावा किंवा दिलेल्या पोर्टलला भेट द्यावी, असे आवाहन मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहाचे गृहप्रमुख यांनी केले आहे.

0000

सहकारी संस्थांना पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 25 (जिमाका): जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या सहकारी संस्थांना त्यांच्या योगदानाबद्दल सन्मानित करण्यात येणार आहे. शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग आणि सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांनी याबाबत सूचना जारी केल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांनी 2 जुलै ते 18 जुलै 2025 या कालावधीत आपल्या संस्थेचे मुख्यालय असलेल्या संबंधित तालुक्यातील उपनिबंधक, सहायक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून आपले प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन सहकारी संस्था, जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांनी केले आहे. प्रस्ताव सादर करताना काही अडचणी आल्यास, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाशी संपर्क साधवा.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 18.07.2025

बँकांनी उद्योगाला कर्ज सुविधा देऊन अर्थव्यवस्थेला गती द्यावी -जिल्हाधिकारी आशिष येरेकर *एक जिल्हा एक उत्पादन मान्यवरांना भेट देणार अमरावती, ...