क्रीडा क्षेत्राला निधी देऊन आंतरराष्ट्रीय क्रीडापटू घडविणार
-पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
अमरावती, दि. 10 : बदलत्या काळानुसार मातीवरील कुस्ती आता मॅटवर खेळायला सुरुवात झाली आहे. मातीवरील कुस्तीला महत्त्व असले, तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर मॅटवरील कुस्तीला महत्त्व आहे. त्यामुळे येत्या काळात आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविण्यासाठी क्रीडा क्षेत्राला पुरेपूर निधी घेऊन सक्षम करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
विभागीय क्रीडा संकुलात आज कुस्ती मॅट आणि इतर क्रीडा साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार संजय खोडके, सुलभा खोडके, रवी राणा, राजेश वानखेडे, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, अमरावतीला पुण्याशी जोडण्यासाठी वंदे भारत रेल्वे सुरू करण्यात आली आहे. हा विकसित भारताला संकल्प राहणार आहे. येत्या काळात विमानानेही पुण्याला जोडण्याचा प्रयत्न राहणार आहे. आज शेकडो खेळाडू पुण्याशी जोडल्या गेले आहे. त्यामुळे या दोन शहरादरम्यान वाहतुकीची गतिमान सुविधा होणे गरजेचे आहे. आज भारतात प्रत्येक क्षेत्रात इतिहास घडवत असून क्रीडाक्षेत्रही मागे राहिले नाही. त्यामुळे दर्जेदार क्रीडा सोयीसुविधा उपलब्ध करून अमरावतीला क्रीडा क्षेत्रात न्यायचे पुढे आहे.
जागतिक बुद्धिबळमध्ये 19 वर्षीय दिव्या देशमुख यांनी इतिहास घडवला आहे. ती भारताची 88 ग्रॅण्डमास्टर ठरली आहे. अशा प्रकारचा इतिहास अमरावतीमध्ये घडवणे गरजेचे आहे. महाराष्ट्र केसरीमुळे कुस्तीला महत्त्व आले असून ऑलम्पिक स्पर्धांमध्येही हा खेळ गेला आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर कुस्तीगीर घडत आहे. विभागीय क्रीडा संकुलाच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असलेला निधी देण्यात येईल. तसेच येत्या काळात व्यायाम शाळेसाठी 15 लाख, व्यायाम शाळा बांधकामासाठी 15 लाख आणि क्रीडांगण दुरुस्तीसाठी 25 लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. तसेच इको टुरिझममधून एका ठिकाणच्या कामासाठी 30 कोटींचा निधी देण्यात येणार आहे. त्यामुळे विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा येथे कोलकाससह चार कामे प्रस्तावित करण्यात आली आहे.
यावेळी ज्येष्ठ क्रीडापटूंच्या सत्कार करण्यात आला. तसेच खेळाडूंना क्रीडा साहित्याची वाटप करण्यात आले. कुस्तीगीर परिषदेतर्फे पालकमंत्री यांना चांदीची गदा देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हा क्रीडा अधिकारीग णेश जाधव यांनी प्रास्ताविक केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते 94 लाख रुपये किमतीचे क्रीडा साहित्य वाटप करण्यात आले.
00000
महावितरणच्या
जरीदा उपकेंद्रामुळे ५० गावाचा विजेचा प्रश्न सुटला
*सर्वोच्च
न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश भुषण गवई यांचे विशेष प्रयत्न
५ एमव्हीए क्षमता असलेल्या या उपकेंद्राला ३३ केव्ही
वाहिनीव्दारे २२० केव्ही कोयलारी (मध्य प्रदेश) उपकेंद्रातून वीज पुरवठा करण्यात येणार
आहे. उपकेंद्राचे काम ऑक्टोबर २०२३ ला पुर्ण झाले आहे. परंतु ३३ केव्ही उपकेंद्र व
वाहिनीचा काही भाग वन्य जीव संरक्षण कायदा आणि वन संरक्षण कायदा अंतर्गत येत असल्याने
मंजूरीकरीता प्रस्ताव वन खात्याकडे पाठविण्यात आला. त्यांनतर महावितरणसोबत तत्कालिन
जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्यामार्फतही नियमित आढावा आणि सर्व लोकप्रतिनिधींनी सातत्याने
पाठपुरावा केला.
00000
अनुसूचित जमाती कल्याण
समितीचा जिल्ह्याचा दौरा निश्चित
*१९ ते २१ ऑगस्ट २०२५
दरम्यान दौऱ्याचे नियोजन
अमरावती, दि. ९ : अनुसूचित जमाती कल्याण समिती ही दि.
१९ ते २१ ऑगस्ट २०२५ दरम्यान अमरावती जिल्ह्याचा दौरा करणार आहे. या दौऱ्यामध्ये
प्रशासकीय बाबींसह विविध शासकीय कार्यालयांमधील अनुसूचित जमातीच्या अधिकारी आणि
कर्मचाऱ्यांशी संवाद साधणार आहे.
दौऱ्यानुसार मंगळवार, दि. १९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता समितीचे सदस्य शासकीय विश्रामगृह, अमरावती येथे एकत्र जमणार आहेत. सकाळी ९.३० ते १० दरम्यान शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्या समवेत अनुसूचित जातीच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना, तसेच अडचणीबाबत चर्चा करतील. त्यानंतर सकाळी १० ते ११ यादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी आणि जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपरिषद येथील अनुसूचित जमातीच्या अधिकारी, कर्मचारी यांची भरती, आरक्षण, अनुशेष आणि जात पडताळणी यांसारख्या विषयांवर चर्चा केली जाईल. तसेच आदिवासी उपयोजना क्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांबाबत चर्चा करण्यात येणार आहे. सकाळी ११ ते १२ या वेळेत पोलीस आयुक्त (शहर) आणि पोलीस अधीक्षक (ग्रामीण) यांच्या कार्यालयातील संबंधित बाबींवर चर्चा करण्यात येणार आहे. दुपारी १२ ते १२.३० या वेळेत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, अमरावती कार्यालयातील अधिकाऱ्यांसोबत चर्चा होईल.
दुपारी १२.३० ते १ या वेळेत राज्य उत्पादन शुल्क कार्यालय, अमरावती येथील अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली जाईल. दुपारी १ ते १.३० या वेळेत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय, अमरावती येथील अधिकाऱ्यांसोबत चर्चा होईल. दुपारी १.३० ते २.३० पर्यंत राखीव राहील. त्यानंतर संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे दुपारी २.३० ते ३.३० दरम्यान अनुसूचित जमाती प्रवर्गातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या संदर्भात चर्चा करतील. जिल्हा परिषद अमरावती येथे दुपारी ३.३० ते ५ दरम्यान जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांसोबत समवेत चर्चा करतील. तसेच सायंकाळी ५ ते ६:३० दरम्यान एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, धारणी यांच्या अधिकाऱ्यांसोबत अनुसूचित जमातीच्या कल्याणकारी योजना आणि इतर बाबींवर चर्चा होईल. त्यानंतर समिती ही शासकीय विश्रामगृह, अमरावती येथे मुक्काम करेल.
बुधवार, २० ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते सायं ५ या वेळेत समिती जिल्ह्यातील
प्रकल्प कार्यालयांतर्गत येणाऱ्या शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळा, वसतिगृहांना भेट
देईल. तसेच जिल्हा परिषद यंत्रणाकडून राबविण्यात आलेल्या कामांना भेटी देतील.
त्यानंतर समिती शासकीय विश्रामगृह, चिखलदरा येथे मुक्काम करेल.
गुरुवार, दि. २१ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता समिती चिखलदऱ्याहून अमरावतीकडे प्रयाण करेल. त्यानंतर अमरावती महापालिकेत सकाळी ११.३० ते १२.३० या वेळेत महानगरपालिका आस्थापना आणि शिक्षण विभाग, महानगरपालिका अमरावती येथील अधिकाऱ्यांसोबत चर्चा होईल. दुपारी १२.३० ते ३ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीत दौऱ्यात शासकीय कामकाजाबाबत आढळलेल्या त्रुटी आणि कार्यवाहीबाबत चर्चा केली जाईल.
समितीमध्ये समितीचे प्रमुख दौलत दरोडा आहेत. सदस्यांमध्ये हरिशचंद्र भोये, डॉ. मिलिंद नरोटे, केवलराम काळे, राजू तोडसाम, राजेश पाडवी, शांताराम मोरे, मंजुळा गावित, हिरामण खोसकर, आदित्य ठाकरे, रामदास मसराम, उमा खापरे, इद्रिस नायकवडी, राजेश राठोड, सुनिल शिंदे आणि निमंत्रित सदस्य विनोद निकोले यांचा समावेश आहे.
00000
No comments:
Post a Comment