Tuesday, August 19, 2025

DIO NEWS AMRAVATI 19.08.2025



















                                           अनुसूचित जमाती कल्याण समितीचा आजपासून दौरा सुरू

*विविध विभागांचा घेतला आढावा

अमरावती, दि. 19 (जिमाका): अनुसूचित जमाती कल्याण समितीचा दौरा आजपासून सुरू झाला आहे. समिती उद्यापासून दोन दिवस धारणी आणि चिखलदरा तालुक्याचा दौरा करणार आहे.

अनुसूचित जमाती कल्याण समितीचा दौऱ्यानिमित्त शासकीय विश्रामगृहात आज सकाळी समितीच्या सदस्यांनी चर्चा केली. जिल्ह्यातील नागरिक, लोकप्रतिनिधी, संस्थांचे प्रतिनिधी यांचे निवेदने स्विकारली.

त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात समितीचे प्रमुख दौलत दरोडा यांच्यासह समितीचे सदस्य केवलराम काळे, राजू तोडसाम, शांताराम मोरे, मंजुळा गावित, रामदास मसराम, उमा खापरे, राजेश राठोड, विनोद निकोले यांनी समितीच्या कामकाजात सहभाग घेतला.

समितीने जिल्हाधिकारी कार्यालय, नगरपालिका, नगर परिषद, पोलिस विभाग, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, राज्य उत्पादन शुल्क, वन, पुरवठा, क्रिडा, कृषी, पशुसंवर्धन, महिला व बालविकास, शिक्षण, सामान्य प्रशासन, बांधकाम, पाणीपुरवठा, लघू पाटबंधारे, आरोग्य, आदिवासी विकास, जिल्हा परिषद, प्रादेशिक परिवहन, राज्य परिवहन महामंडळाचा आढावा घेतला. समिती सदस्यांनी प्रत्येक विभागातील पदभरती, आरक्षण, अनुशेष, जात पडताळणी, तसेच आदिवासी उपयोजना क्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत चर्चा केली. तसेच उपयुक्त सूचना केल्या.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...