केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा जिल्हा दौरा
अमरावती, दि.12 (जिमाका) : केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा बुधवार, दि. 13 ऑगस्ट 2025 रोजीचा जिल्ह्याचा दौरा आहे.
दौऱ्यानुसार, सकाळी 10.15 वाजता सिल्व्हर स्टार सभागृहात आयोजित बैठकांना उपस्थित राहतील. सोयीने विश्रामगृह आणि त्यानंतर दुपारी 3 वाजता अमरावती येथून नागपूरकडे रवाना होतील.
00000
उद्योग मंत्री उदय सामंत यांचा जिल्हा दौरा
अमरावती, दि.12 (जिमाका) : उद्योग मंत्री उदय सामंत यांचा बुधवार, दि. 13 ऑगस्ट 2025 रोजीचा जिल्ह्याचा दौरा आहे.
दौऱ्यानुसार, सकाळी 11 वाजता सिल्व्हर स्टार सभागृहात आयोजित बैठकीला उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी 3 वाजता नांदगाव पेठ येथील कौशल्य विकास केंद्रात पीएम मित्रा औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधा व कौशल्य विकास केंद्राची पाहणी व आढावा बैठक घेतील. त्यानंतर सायंकाळी 4.30 वाजता अमरावती येथून नागपूरकडे रवाना होतील.
00000
ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांचा गुरूवारी दौरा
अमरावती, दि. 12 (जिमाका) : कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील हे गुरूवार, दि. 14 ऑगस्ट रोजी जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.
दौऱ्यानुसार, गुरूवार, दि. 14 ऑगस्ट रोजी 3 वाजता विश्रामगृह, तिवसा येथे आगमन व तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्यासमवेत तालुक्यातील शेतकरी आत्महत्या व शासकीय जमिनीवर चारा लागवड यासंबंधी चर्चा करतील. दुपारी 3.30 वाजता आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियास भेट देतील. दुपारी 4.30 वाजता प्रस्तावित शासकीय गायरान जमिनीवर चारा लागवडीच्या ठिकाणास भेट व पाहणी करतील. सायंकाळी 5.30 वाजता सोईनुसार काटोलकडे प्रयाण करतील.
00000
तेल काढणी युनिटसाठी अर्ज करण्याचे आवाहन
*18 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्यास मुदत
अमरावती, दि. 12 (जिमाका) : तेल काढणी युनिटसाठी शेतकऱ्यांसाठी अनुदान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी इच्छुकांनी 18 ऑगस्टपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया सन 2025-26 मध्ये काढणी पश्चात पायाभूत सुविधा या घटकांतर्गत तेल काढणी युनिट घटकाकरीता शेतकरी उत्पादक संस्था, कंपनी आणि सहकारी संस्था यांना अर्ज करता येणार आहे. यामध्ये बियाणे संकलन आणि तेल काढण्याची कार्यक्षमता वाढविण्यासाठी 10 टन क्षमतेचा तेल काढणी युनिट आणि तेलबियांवर प्रक्रिया करण्यासाठी यंत्रसामुग्री आणि उपकरणे आणि तेलबिया प्रक्रिया युनिटकरीता प्रकल्प खर्चाच्या 33 टक्के किंवा कमाल 9 लाख 90 हजार यापैकी जे कमी असेल त्याप्रमाणे अनुदान अनुज्ञेय राहणार आहे.
केंद्र शासनाच्या सुचनेनुसार सीपेट, लुधियाना व यासारख्या इतर केंद्रीय संस्थेने तपासणी केलेल्या मिनी ऑईल मिल, ऑईल एक्सपीलिअरची उत्पादकनिहाय तेलघाणा मॉडेलला अनुदान अनुज्ञेय राहिल. सदर बाब बँक कर्जाशी निगडीत असून इच्छुक प्रक्रिया भागीदाराने केंद्र शासनाच्या ग्रामीण भंडारण योजना, नाबार्डच्या मार्गदर्शक सुचनांनुसार बँकेकडे प्रकल्प सादर करावा, बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर संबंधीत अर्जदार सदर बाबींच्या लाभास पात्र राहणार आहे.
योजनेच्या माहितीसाठी सहायक कृषि अधिकारी, उपकृषि अधिकारी व मंडळ कृषि अधिकारी यांच्याशी सपंर्क साधावा, तसेच इच्छुक अर्जदारांनी दि. 18 ऑगस्ट 2025 पर्यंत तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.
0000
No comments:
Post a Comment