Monday, August 25, 2025

DIO NEWS AMRAVATI 25.08.2025









                                  गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याकडून

चांदूर रेल्वे नवीन पोलिस ठाण्याची पाहणी

*जीम, स्विमींग पुल बांधण्याच्या सूचना

अमरावती, दि. 25(जिमाका) : गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आज चांदूर रेल्वे येथील पोलिस ठाण्याला भेट दिली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील पोलिस ठाण्याची माहिती घेतली. त्यानंतर बांधकाम सुरू असलेल्या नवीन पोलिस ठाण्याची पाहणी केली.

यावेळी आमदार प्रताप अडसड, जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद, उपविभागीय अधिकारी तेजस्वीनी कोरे आदी उपस्थित होते.

गृहराज्यमंत्री डॉ. भोयर यांनी सुरवातीला चांदूर रेल्वे पोलिस ठाण्याला भेट दिली. यावेळी त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांच्याकडून जिल्ह्यातील पोलिस ठाण्याच्या इमारतींची माहिती घेतील. त्यांनी जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांच्या इमारतीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. याला मंजुरी मिळताच तातडीने कामे पूर्ण करण्यात येतील, असे सांगितले. यानंतर डॉ. भोयर यांनी बांधकाम सुरू असलेल्या पोलिस ठाण्याची पाहणी केली. बांधकाम गतीने पूर्ण करावेत, तसेच चांगल्या दर्जाचे काम करण्याच्या सूचना दिल्या. नोव्हेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे लक्ष असल्याची माहिती देण्यात आली. तालुक्यातील इतरही इमारतींचे कामे पूर्ण करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

आसेगाव पुर्णा, चांदूर रेल्वे आणि बेनोडा या तीन नवीन पोलिस ठाण्याच्या इमारतीसाठी 12 कोटी रूपयांचा निधी देण्यात आला आहे. हे काम नोव्हेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. प्रत्येक पोलिस ठाण्याचे सुमारे 1 हजार चौरस मीटरचे बांधकाम होणार आहे. तळमजला आणि पहिला मजला सुविधांसह बांधकाम करण्यात येणार आहे. पोलिस ठाण्याचे करण्यात येणारे बांधकाम चांगल्या प्रतीचे करावे, अशा सूचना डॉ. भोयर यांनी केल्या. तसेच चांदूर रेल्वे येथे नागरिकांच्या सोयीसाठी उत्कृष्ठ प्रतिचा स्विमिंग पूल आणि जीम प्रस्तावित करावा. यासाठीचा प्रस्ताव तातडीने सादर करावा. या स्विमिंग पूल आणि जीमची देखभाल, दुरूस्ती पोलिस विभागाने करावे. यामुळे या सुविधा सुव्यवस्थित राहण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

0000

 

  

भगवान चक्रधरस्वामी यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

अमरावती, दि. 25 (जिमाका) : महानुभाव पंथाचे संस्थापक भगवान चक्रधर स्वामी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर  यांनी  प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, निवडणूक उपजिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे, उपजिल्हाधिकारी रोहयो ज्ञानेश्वर घ्यार, जिल्हा पुनवर्सन अधिकारी श्रध्दा उदावंत, तहसिलदार निलेश खटके  यांच्यासह अधिकारी-कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनीही भगवान चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.

 

00000

नैसर्गिक आपत्तीचे केवळ 15 दिवसांत पंचनामे अपलोड

*तत्पर प्रशासनाने आपत्तीग्रस्तांना तात्काळ मदत

अमरावती, दि. 25 (जिमाका): नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने जलदगतीने मदत पोहोचवण्यासाठी पावले उचलली आहेत. नुकसानीची भरपाई तातडीने मिळावी यासाठी विशेष प्रयत्न करून नैसर्गिक आपत्तीचे केवळ 15 दिवसांत पंचनामे अपलोड करण्यात आले आहे. यामुळे आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळण्यास मदत होणार आहे.

जून २०२५ मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिक, फळपिकाच्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी ऑगस्ट २०२५ मध्ये शासनाने मान्यता दिली आहे. पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर तात्काळ मदत देण्यासाठी बाधित शेतकऱ्यांच्या याद्या केवळ १५ दिवसांच्या कालावधीत, म्हणजे २२ ऑगस्ट २०२५ पर्यंत ई-पंचनामा पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या आहे. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाच्या तत्परतेने जिल्हास्तरावरुन या याद्यांना मान्यताही मिळाली आहे.

तसेच एप्रिल आणि मे २०२५ या कालावधीमध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीपिक, फळपिकांच्या नुकसानीसाठी २२ जुलै २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता मिळाली आहे. संबंधित तालुक्यांकडून एकूण १७,६६९ बाधित शेतकऱ्यांच्या २३ कोटी २७ लाख रूपयांच्या याद्या ई-पंचनामा पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या आहेत. या याद्यांनाही जिल्हास्तरावरुन मान्यता मिळाली आहे.

नैसर्गिक आपत्तीमधील मदत हा शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत जिव्हाळा आणि महत्त्वाचा विषय आहे. जिल्हा प्रशासन पात्र शेतकरी लाभार्थ्यांचे अनुदान वितरणासाठी आवश्यक प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने दक्ष असून कार्यरत आहे, असे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी सांगितले.

00000

शासकीय वसतिगृहातील प्रवेश प्रक्रियेला 15 सप्टेंबरपर्यंत मुदत

अमरावती, दि. 25 (जिमाका) : जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज, इतर मागासवर्ग आणि आर्थिक मागास प्रर्वगातील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना न्याय विभागाच्या मागासवर्गीय मुला, मुलींचे शासकीय वसतिगृहात प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रवेशित विद्यार्थ्यांना सर्व सोयीसुविधा मोफत पुरविण्यात येतात. सन 2025-26 साठी व्यावसायिक अभ्यासक्रम शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावयाचा असल्यास विद्यार्थ्यांसाठी hmas.mahait.org पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. सन 2025-26 करिता व्यावसायिक अभ्यासक्रमात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन, तसेच ऑनलाईन भरलेले अर्ज पोर्टलवरुन डाऊनलोड करुन त्याची प्रिंट घेवून संबंधित वसतिगृहामध्ये ऑफलाईन अर्ज सादर करावेत.

व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेशाकरीता विभागीय स्तरावरील मागासवर्गीय 1 हजार  मुलांकरीता शासकीय वसतिगृह, संत गाडगे महाराज मुलांचे शासकीय वसतिगृह, निंभोरा, तसेच मुलींसाठी 125 जयंती मागासवर्गीय मुलींचे नवीन विलास नगर, अमरावती तसेच तालुकास्तरावरील मुला, मुलींचे शासकीय वसतिगृह यांच्यासाठी ऑनलाईन अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया सुरु आहे.

व्यावसायिक अभ्यासक्रम अर्ज स्विकृतीची मुदत 15 सप्टेंबर 2025 असून प्रवेशाची यादी 18 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज संबंधित वसतिगृहाकडे सादर करावेत. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्रमांक 0721-2661261 यावर संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 04-09-2025

  जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपाच्या ४५ पदांसाठी रोजगार मेळावा     अमरावती, दि. ४ : जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्त्वावरील ४५ पदांवर न...