राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा
अमरावती, दि. 26 (जिमाका): हॉकीचे खेळाडू मेजर ध्यानंचद यांचा जन्मदिन दि. 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त क्रीडा व खेळाचा प्रचार व प्रसार व्हावा, तसेच शहरी व ग्रामीण भागातील नागरीकांपर्यंत क्रीडा व खेळाचे महत्व पोहोचविणे, निरोगी राहण्याचा संदेश, युवक युवतीमध्ये क्रीडा विषयक वातावरण निर्माण व्हावे, क्रीडा संस्कृतीचे संवर्धन व जतन व्हावे. यासाठी विविध उपक्रम क्रीडा दिनाच्या निमित्याने आयोजित करण्यात येत आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे क्रीडा स्पर्धा उपक्रमाअंतर्गत दि. 29 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता मॅरेथॉन स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार आहे. ही मॅरेथॉन जिल्हा क्रीडा संकुल येथून निघून बियाणी चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, हायस्कुल चौक. गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कुल चौक येथून परत गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कुल चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, बियाणी चौक, जिल्हा क्रीडा संकुल येथे मॅरेथॉनचा समारोप होईल.
मॅरेथॉन स्पर्धा या खुला गट पुरुष व महिला स्वतंत्रप्रमाणे दोन प्रकारात होतील. पुरुष व महिला गटात प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या खेळाडुस 3 हजार, व्दितीय 2 हजार, तृतिय 1 हजार रोख पारितोषिक, तसेच सर्व सहभागींना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी क्रीडा अधिकारी त्रिवेणी बाते मो.नं. 9975590232 यांच्याशी संपर्क साधावा, तसेच खेळाडुंनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.
000000
सण उत्सव कालावधीत शहरात कलम 36 लागू
अमरावती, दि. 26 (जिमाका): जिल्ह्यात आगामी काळात सण उत्सव साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात पोलीस अधिनियमांतर्गत कलम 36 लागू झाले आहे.
शहरात श्रीशेणशोत्सव सुरू होणार असून त्यादिवशी अमरावती कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात श्रीची स्थापना करण्यात येणार आहे. तसेच मुस्लीम धर्मियांचा ईद-ए-मिलाद हा सण साजरा करण्यात येणार आहे. या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 36 नुसार सर्व पोलीस आयुक्तालयाच्या परिसरातील सर्व पोलिस ठाणेदार, अंमलदार व त्यांच्यावरील अधिकाऱ्यांना दि. 26 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर 2025 च्या मध्यरात्रीपर्यंत अधिकार प्रदान करण्याचे आदेश पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी दिले आहे.
रस्त्यावरून जाणारी मिरवणूक सुरळीत ठेवणे, उपासनास्थळी गर्दी होणार असेल किंवा अडथळ्याचा संभव असेल तर अडथळा होऊ न देणे, सर्व मिरवणूकाच्या व जमावाच्या प्रसंगी व पूजा-अर्चा या ठिकाणी कोणताही रस्ता किंवा अडथळा संभव असेल अशा सर्व बाबतीत अडथळा न होवू देण्यासाठी याठिकाणी बंदोबस्त ठेवणे, सर्व रस्त्यांवर किंवा रस्त्यात, सर्व धाब्यावर आणि सार्वजनिक ठिकाणच्या कपडे धुण्याचा व उतरविण्याचा जागेच्या ठिकाणी व इतर सर्व सार्वजनिक किंवा लोकांच्या येण्याच्या जागेमध्ये बंदोबस्त राहण्यासाठी, वाद्यांबाबत नियम व नियंत्रण ठेवणे, सार्वजनिक जागेत ध्वनिक्षेपकाच्या वापराबाबत नियम व नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. यासाठी हे आदेश देण्यात आले आहे.
0000
मोझरी आयटीआयमध्ये प्रवेशाची पहिली समुपदेशन फेरी पूर्ण
अमरावती, दि. 26 (जिमाका): मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दि. 25 ऑगस्ट रोजी पहिली केंद्रीय समुपदेशन प्रवेश फेरी पार पडली.
सदर प्रवेश फेरी करिता संस्थेचे प्राचार्य आनंद वाळके यांनी प्रवेशप्रक्रिया राबविली. तसेच संस्थेचे गटनिदेशक व शिल्प निदेशक यांनी सुद्धा प्रवेश प्रक्रियेत आपली कामगिरी उत्कृष्टरित्या बजावली.
सुरुवातीला समुपदेशन फेरीमध्ये 59 प्रवेश निश्चित करण्यात आले. प्रवेशार्थ्यांनी न्यूनतम व्यवसाय सोलर टेक्निशियन तथा इतर व्यवसायामध्ये प्रवेशाकरिता उत्तम प्रतिसाद दिला. केंद्रीय समुपदेशन फेरीत प्रवेश मिळालेला नसलेल्या उमेदवारांसाठी प्रवेशाची अंतिम संधी म्हणजेच संस्थास्तरीय समुपदेशन फेरी दि. 28 ऑगस्ट ते 31ऑगस्टला राहील.
सदर प्रवेश फेरी करिता प्रशिक्षणार्थ्यांनी दि. 28 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजेपासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत संस्थेमध्ये येऊन हजेरी लावायची आहे. त्यानंतर ठीक दुपारी 1 वाजता गुणवत्ता यादी प्रदर्शित होऊन गुणवत्ता यादीनुसारच प्रवेश दिले जातील.
प्रवेशाकरिता संस्थेमध्ये सोलर टेक्निशियन, यांत्रिक डिझेल, आरेखक यांत्रिकी, वूडवर्क टेक्निशियन, फॅशन टेक्नॉलॉजी इत्यादी व्यवसायाच्या एकूण 38 जागा रिक्त आहेत. वरील सर्व व्यवसायाकरिता शासकीय तथा निम शासकीय व खाजगी औद्योगिक आस्थापनेमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. परिसरातील सर्व विद्यार्थ्यांनी या संस्थेत प्रवेश घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य ए. डी. वाळके यांनी केले आहे.
000000
नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन
अमरावती, दि. 26 (जिमाका): अमरावती-बडनेरा रेल्वे मार्गावरील रेल्वे उड्डाणपुल वाहतुकी योग्य नसल्याने यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अमरावती-बडनेरा रेल्वे मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाचे संरचनात्मक लेखपरिक्षण प्राप्त झाले आहे. त्यामुळे जुना आरबीओ तोडून नवीन आरबीओ बांधण्यासाठी या उड्डाणपुलावरून होणारी सर्व वाहतुक पादचारीसह बंद करण्यात आली आहे. सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून खबरदारीची उपाययोजना म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सरंचनात्मक परिक्षण अहवालाआधारे सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी आवश्यक आहे.
प्रवेश बंदी सर्व प्रकारचे वाहन पादचारीसह शहरात अमरावती-बडनेरा रेल्वे मार्गावरील राजकमल चौक, हमालपूरा, जयस्तंभ चौक, रेल्वे स्टेशन चौक या मार्गाना जोडणाऱ्या रेल्वे उड्डाणपूलावरून सर्व प्रकारचे वाहनांना सदर उड्डाणपुलावरून पुढील आदेशापर्यंत प्रवेश बंदीचे आदेश देण्यात आले आहे.
त्यामुळे पर्यायी मार्ग हमालपूराकडून येणारी प्रतिबंधित वाहने बस स्टँड मार्गे रेल्वे स्टेशन मर्च्युरी टी पॉईट असे यावे. बसस्थानककडून येणारी प्रतिबंधित वाहने बस स्टॅड मार्गे रेल्वे स्टेशन मर्च्युरी टी पॉईट असे यावे. राजकमल चौक व जयस्तंभ चौक कडून येणारी प्रतिबंधित वाहने हे राजापेठ पोलिस स्टेशन समोर राजकमल चौक-जयस्तंभ चौक-मालवीय चौक या मार्गाचा वापर करावा लागणार आहे.
सदर अधिसुचनेचे उल्ल्ंघन करणाऱ्याविरूध्द मोटार वाहन कायदा 1988 व महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 नुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे, असे पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांनी कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment