अनुसूचित जमाती कल्याण समितीची शाळा, आरोग्य केंद्राला भेटी
अमरावती, दि. 21 (जिमाका): अनुसूचित जमाती कल्याण समितीने आज मेघाटातील विविध ठिकाणी भेटी दिल्या. यात समितीने शाळा, आरोग्य उपकेंद्र आदींना भेट दिली.
या पाहणी दौऱ्यात समितीचे प्रमुख दौलत दरोडा यांच्यासह समितीचे सदस्य हरिशचंद्र भोये, केवलराम काळे, राजू तोडसाम, शांताराम मोरे, मंजुळा गावित, रामदास मसराम, उमा खापरे, राजेश राठोड, विनोद निकोले सहभागी झाले आहेत.
आजच्या पाहणी दौऱ्यात समिती सदस्यांनी सकाळी एकलव्य मॉडेल स्कूलच्या इमारतीची पाहणी केली. यावेळी त्यांनी इमारतीची तातडीने दुरुस्ती करून शाळा सुरू करण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर देवी पॉइंट येथे भेट दिली. मोथा येथील जिल्हा परिषदेच्या पूर्व माध्यमिक शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला, त्यानंतर मोथा प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला भेट दिली. तसेच अंगणवाडीची पाहणी केली.
समिती सदस्यांनी मडकी येथील उमेद बचत गटाच्या स्टॉलला भेट देऊन त्यांच्या कार्याची माहिती घेतली. त्यानंतर चिखलदरा नगरपरिषदेला भेट दिली. समिती सदस्यांनी सीमाडोह वन संकुलाला भेट दिली. मेळघाटातील आकर्षण असलेल्या कोलकाज येथील विश्रामगृहाला भेट देऊन पाहणी केली. सिपणा वन्यजीवच्या उपवनसंरक्षक नीता कट्टे यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाबद्दल माहिती दिली.
00000
उपवनसंरक्षक अमरावती वन विभागाची कामगिरी
अमरावती, दि. 21 (जिमाका): वनविभागाच्या कार्यक्षेत्रातील तपोवन टेकडी, मार्डी रोड, तेजस विहार नगर व तपोवन परिसरामध्ये गेल्या काही दिवसापासून बिबट वारंवार नागरी वस्तीमध्ये शिरून घरातील पाळीव कुत्र्यांना उचलुन नेत असल्याची माहिती प्राप्त झालेली होती. या बाबत त्वरीत अमरावती वन विभागातील वनपरिक्षेत्र (प्रा.) वडाळी, शिकार प्रतिबंधक पथक अमरावती, मानद वन्यजीव रक्षक अमरावती जिल्हा व स्थानिक स्वयंसेवी संस्थाच्या सहकार्याने सदर परिसराची पाहणी करून स्थानिक नागरिकांशी संवाद साधला यावेळी बिबट्याच्या सवयी, पर्यावरणातील त्याची भूमीका तसेच मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी करावयाच्या बाबींवर कार्यशाळा घेण्यात आली, तसेच बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सुयोग्य ठिकाणी पिंजरे लावण्यात आले.
दि. 15 ऑगस्ट 2025 रोजी सदर बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. पशु वैद्यकीय अधिकारी यांनी सदर बिबटची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला सुरक्षित रित्या त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. अशी माहिती अमरावती वन विभागाचे उपवनसंरक्षक अर्जुना के. आर. यांनी दिली.
00000
अनुसूचित जातीमधील इच्छुकांनी महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
अमरावती, दि. 21 (जिमाका): महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित अमरावती मार्फत अनुसूचित जाती, नवबौध्द संवर्गातील पात्र अर्जदारांनी कर्ज, अनुदानासाठी स्वयंरोजगारासाठी अर्थ सहाय्य उपलब्ध करून दिले जाते. चालु आर्थिक वर्ष 2025-26 साठी महामंडळाच्या मुख्यालयाकडून अनुदान कर्ज योजनेंतर्गत 90, बिजभांडवल कर्ज योजनेंतर्गत 90 तसेच थेट कर्ज योजनेंतर्गत 40 असे एकुण 220 लाभार्थ्यांना कर्ज व अनुदान वाटप करण्याचे उद्यिष्ट प्राप्त झाले आहे.
वरील योजनांचे अर्ज महामंडळाच्या https://mpbcdc.maharashtra किंवा https://mahadisha.mpbcdc या संकेतस्थळावर जाऊन कर्जाचे अर्ज भरण्यात यावे. अधिक माहितीसाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालय अमरावती येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक सौ. एम. ए. अवघाते यांनी केले आहे.
000000
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment