कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांच्या शैक्षणिक खर्चासाठी 10 हजार रूपये साह्य अर्ज करण्याचे महिला व बालविकास अधिका-यांचे आवाहन

 कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांच्या शैक्षणिक खर्चासाठी 10 हजार रूपये साह्य

अर्ज करण्याचे महिला व बालविकास अधिका-यांचे आवाहन

अमरावती, दि. 21 : कोरोना साथीमुळे एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या तीन ते 18 वर्षांपर्यंत वय असलेल्या बालकांच्या शैक्षणिक खर्चासाठी प्रतिबालक 10 हजार रूपये मदत बाल न्याय निधीमधून देण्यात येत आहे. त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी डॉ. उमेश टेकाडे यांनी केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये बाल न्याय निधी जिल्ह्याला उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीमधून कोरोना साथीमुळे एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या वयोगट 3 ते 18 दरम्यानच्या बालकांच्या शैक्षणिक खर्चासाठी प्रतिबालक 10 हजार रूपये निधी वितरित करण्याचे आदेश आहेत. त्यानुसार पात्र लाभार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन डॉ. टेकाडे यांनी केले.

                        अर्ज येथे मिळतील

अर्जाचा विहित नमुना तालुक्याच्या ठिकाणी एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात किंवा बाल संरक्षण अधिकारी कार्यालयात मिळेल. त्याचप्रमाणे,  अमरावती शहरात दसरा मैदान रस्त्यावरील भुतेश्वर चौकात दत्तात्रय सदन इमारतीत स्थित जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयातही अर्ज उपलब्ध आहेत.

                        आवश्यक कागदपत्रे

अर्थसाह्य मिळण्यासठी अर्जासोबत, बालकाचे शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र, दिवंगत पालक कोविड पॉझिटिव्ह असल्याबाबतच्या पुराव्याची झेरॉक्स प्रत, दिवंगत पालक मृत्यू दाखला, बालक अथवा बालक व पालकांचे संयुक्त राष्ट्रीयकृत बँकेत खाते असल्याचा पुरावा, बँक खाते पासबुक, बालकाची आधारकार्डाची झेरॉक्स प्रत आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.

        अधिक माहितीसाठी संपर्क

अधिक माहितीसाठी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय डबले यांच्याशी 9021358816 किंवा विधी तथा परिविक्षा अधिकारी ॲड. सीमा भाकरे यांच्याशी 9823540805 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

000 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती