शेतकरी अपघात विमा योजना व राष्ट्रीय अर्थसहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते धनादेश वाटप

 







शेतकरी अपघात विमा योजना

व राष्ट्रीय अर्थसहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते धनादेश वाटप

 

 अमरावती दि 19 : शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू किंवा इतर घटनेमध्ये शेतकऱ्याची जीवितहानी झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या आधार दिला जातो. शासन अपघातग्रस्त  शेतकरी कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड यशोमती ठाकूर यांनी दिला. शासकीय विश्रामगृहात आज गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या 31 लाभार्थ्यांना श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले.त्यावेळी त्या बोलत होत्या.

धामणगाव रेल्वे,चांदुर बाजार,अचलपूर,मोर्शी,दर्यापूरभातकुलीवरुड तालुक्यातील 31 लाभार्थ्यांना प्रत्येकी 2 लक्ष रुपयांप्रमाणे 61 लक्ष रुपयांचे धनादेश स्वरूपात वाटप करण्यात आले. अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसदारांना धनादेश वितरित करण्यात आले. दीपाली तायवाडेप्रतिभा कडूदुर्गा पोहेकरभाग्यश्री गणोरकरसुरेश गोलहरवनिता मेश्रामसुमन मेश्रामशंकर मेश्रामशीला म्हस्के,मधुकर वाघबेबी कुयटेपार्थ खंडारेमहादेव पेढेकरअनिता बोकडेवनिता टाकअनिता खातदेवजगदीश कडूहरिभाऊ अडलकअशोक निचतविमल सोळंकेधनराज कंबळेवंदना गुलहाने,मीना राऊतसचिन कळसकरराजेंद्र इखारप्रेमीला गभणेरंजना कबलकररंजीत गावंडेसुमन शेंद्रेमाधुरी फरकुंडे व संगीता काठोले आदी उपस्थित होते.

 

राष्ट्रीय अर्थसहाय्य योजनेच्या 20 लाभार्थ्यांना श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते धनादेशचे वाटप

घरातील कर्ता पुरूष गेल्यानंतर त्यांच्या पत्नींसाठी राष्ट्रीय अर्थसहाय्य  योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत अमरावती येथील 11 महिला लाभार्थ्यांना 2 लक्ष 20 हजार आणि भातकुली तालुक्यातील 9 लाभार्थी महिलांना 1 लक्ष 80 हजार रुपयांच्या धनादेशचे वाटप श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रति लाभार्थी 20 हजार रुपयांच्या धनादेश श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते देण्यात आला.

यावेळी अमरावतीचे उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूतभातकुलीचे उपविभागीय अधिकारी डॉ नितीन व्यवहारेजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चाननायब तहसीलदार दिनेश बढियेश्रीमती ठाकरेकेशव पळसकरमंडळ अधिकारी विशाल धोटे व लाभार्थी उपस्थित होते.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती