Wednesday, March 30, 2022

निवृत्तीवेतनधारकांना मार्चच्या वेतनाबाबत सूचना

 निवृत्तीवेतनधारकांना मार्चच्या वेतनाबाबत सूचना

 

            अमरावती, दि.30: अमरावती कोषागारामधून निवृत्तीवेतन स्विकारत असलेल्या राज्य शासनाच्या सर्व निवृत्तीवेतन व कुटूंबनिवृत्तीवेतन धारकांना कळविण्यात येते की, मार्च अखेर असल्याने तसेच माहे एप्रिल महिन्याच्या सुरवातीला शासकीय सुट्टया असल्याने माहे मार्च 2022 चे देय होणारे मासिक निवृत्तीवेतन अदा होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. कृपया सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटुंबनिवृत्तीवेतनधारक यांनी नोंद घेवून सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा कोषागार कार्यालयाचे वरिष्ठ कोषागार अधिकारी शिल्पा पवार यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ

  जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ अमरावती, 13 : सर्वांसाठी घरे उपलब्ध होण्यासाठी श...