समाजकल्याण विभागासाठी ‘डायनॅमिक वेबसाईट’ व नेट सुविधेसाठी दरपत्रक सादर करण्याचे आवाहन

 समाजकल्याण विभागासाठी ‘डायनॅमिक वेबसाईट’

व नेट सुविधेसाठी दरपत्रक सादर करण्याचे आवाहन


अमरावती, दि.30: सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयामार्फत विविध योजनांची कार्यपध्दती, शासन निर्णय व इतर माहितीसाठी डायनॅमिक वेबसाईट तयार करण्यासाठी व सर्व शासकीय निवासी शाळा मुलांचे, तसेच मुलींचे वसतिगृह येथे इंटरनेट लिझ लाईन सुविधा पुरविण्यासाठी इच्छूक संस्थांकडून दरपत्रके मागविण्यात आली आहेत.

  इंटरनेट लिझ लाईन सुविधा ही वायरलेस व वायर या दोन्ही पध्दतीने पुरविण्यात यावी. झिरो डाऊन टाईम सुविधा लिझलाईनची असावी. डाटा प्रायव्हसी व सिक्युरिटी आणि नेटवर्क सुरक्षा आदी लिझ लाईन सुविधेसोबत असणे आवश्यक आहे. 24/7 सपोर्ट टीम असावी. दरपत्रक सादर करणा-या कंपनीला शासकीय व प्रशासकीय कार्यालयाला सुविधा पुरविण्याचा अनुभव असावा.

डायनॅमिक वेबसाईटसाठी दुकाने परवाना असणे बंधनकारक आहे. जी. एस. टी. रजिस्ट्रेशन असावे. उद्यम सर्टिफिकेट असावे. शासकीय वेबसाईट तयार करण्याचा अनुभव, तसेच पीएचपी, जावा व एसक्यूएलची टीम असावी. इच्छूक संस्थांनी ही दरपत्रके दि. 4 एप्रिल 2022 पर्यंत सादर करावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी केले आहे.
                                          000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती