Thursday, March 17, 2022

राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेस मुदतवाढ, वाढलेल्या कालावधीचा लाभ घेऊन जास्तीत जास्त लोकांनी या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरीता आवाहन

 

राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेस मुदतवाढ,

वाढलेल्या कालावधीचा लाभ घेऊन जास्तीत जास्त लोकांनी

या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरीता आवाहन

 

        अमरावती, दि.17: भारत निवडणूक आयोगाने दि.25 जानेवारी 2022 ते 15 मार्च 2022 या कालावधीत राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. या स्पर्धेत भाग घेण्याकरीता असलेल्या कालावधीत वाढ करण्यात आलेली असून या स्पर्धेत आता दि. 31 मार्च 2022 पर्यंत भाग घेता येईल. या अंतर्गत प्रश्न मंजूषा स्पर्धा(क्वीझ  कॉन्टेस्ट) व्हिडीओ तयार करण्याची स्पर्धा (व्हिडीओ मेकिंग कॉन्टेस्ट)   पोस्टर डिजाईन करण्याची स्पर्धा (पोस्टर डिजाईन कॉन्टेस्ट) गाण्याची स्पर्धा (साँग कॉन्टेस्ट)  घोषवाक्य तयार करण्याची स्पर्धा (स्लोगन कॉन्टेस्ट) घेतल्या जाणार आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. तसेच स्पर्धेच्या विजेत्यांना रोख बक्षिसे भारत निवडणूक आयोगाकडून दिली जाणार आहे.

            तरी या स्पर्धेत भाग घेण्याचे वाढीव कालावधीचा लाभ घेवून स्पर्धामध्ये अधिकाधीक लोकांनी भाग घ्यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी अमरावती पवनीत कौर यांनी केले आहे. या संदर्भात सविस्तर माहिती  https://ecisveep.nic.in/contest/ येथे उपलब्ध आहे.

000000

--

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 04-09-2025

  जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपाच्या ४५ पदांसाठी रोजगार मेळावा     अमरावती, दि. ४ : जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्त्वावरील ४५ पदांवर न...