युवकांसाठी 24 रोजी रोजगार भरती मेळावा
अमरावती दि.22 (विमाका): युवकांना रोजगार प्राप्त होण्याच्या उद्देशाने औद्योगिक प्रशिक्षण
संस्था येथे दिनांक 24 रोजी सकाळी अकरा वाजता संस्थेच्या एन.एस.सभागृहात शिकाऊ
भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या भरती मेळाव्यात रेमंड, डेनिम, अद्वैक
हाय टेक पुणे, युनी पोल शिकरापुर अहमदनगर, वेलमेड लॉकींग चाकण, मिंडा कॉरपोरेशन,
टाटा असल आदी ठिकाणाहुन विविध कंपन्या येणार असुन आयटीआय उत्तिर्ण
प्रशिक्षणार्थ्यांनी या भरती मेळाव्यास आवश्यक त्या कागदपत्रांसह उपस्थित राहावे
असे संस्थेच्या प्राचार्या एम.डी.देशमुख यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment