आदिवासी सुशिक्षित बेरोजगांराना विनामुल्य स्पर्धापरीक्षापुर्व प्रशिक्षणाची सुर्वणसंधी

 


आदिवासी सुशिक्षित बेरोजगांराना विनामुल्य

स्पर्धापरीक्षापुर्व प्रशिक्षणाची सुर्वणसंधी

            अमरावती, दि.17 : आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र अचलपुर कॅम्प परतवाडा जि. अमरावती येथे शासनाव्दारे विविध पदासाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धापरीक्षेकरिता आदिवासी उमेदवारांची विनामुल्य प्रशिक्षणाव्दारे तयारी करून घेण्यात येते. प्रशिक्षण कालावधी हा साडेतीन महिन्यांचा असून या कालावधीत प्रशिक्षणार्थींना दरमहा रू. 1000/- दराने विद्यावेतन देण्यात येते. प्रशिक्षण यशस्विरित्या पूर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी विविध विषयांच्या चार पुस्तकाचा संच विनामुल्य देण्यात येतो.

या प्रशिक्षणाकरिता उमेदवार हा आदिवासाठी प्रवर्गतील असून दि.1 एप्रिल 2022 रोजी किमान 18 वर्षे पुर्ण परंतु दि.15 जुलै 2022 रोजी त्याने 30 वर्ष पूर्ण केलेले नसावे. तसेच त्याने किमान एस.एस.सी.परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. व तो सद्या कोणतेही शिक्षण अथवा प्रशिक्षण घेत नसावा. तरी सदर पात्रतेच्या इच्छुक उमेदवारंनी दि. 1 एप्रिल 2022 पासून सुरू होणाऱ्या पहिल्या सत्रासाठी दि. 28 मार्च 2022 पर्यंत आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र जयस्तंभ चौक, मातोश्री मंगल कार्यालय, मागे लालपुल जवळ अचलपुर कॅम्प परतवाडा ता. अचलपूर जि. अमरावती फोन नं. 07223- 221205 अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, एस.एस.सी. उर्त्तीर्णची गुणपत्रिका उपविभागीय अधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र तसेच जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र ऑनलाईन कार्ड, इत्यादी प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती व एक स्वत: चा पासपोर्ट साईज फोटो जाडणे आवश्यक आहे.

यापुर्वी सदर प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांनी यासाठी पुन्हा अर्ज करू नये उमेदवार https://bit.ly/35Jh49r या लिंकवर सुध्दा अर्ज करू शकतात. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी या सुवर्ण संधीचा अवश्य लाभ घ्यावा. असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी अचलपूर, जि. अमरावती यांनी केले आहे.

0000


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती