Tuesday, March 29, 2022

परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवा - जिल्हाधिकारी पवनीत कौर विद्यार्थी, पालक तसेच शिक्षकांना आवाहन

 


परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवा

-    जिल्हाधिकारी पवनीत कौर

विद्यार्थी, पालक तसेच शिक्षकांना आवाहन

 

अमरावती दि. 29 : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील समस्त विद्यार्थी, पालक तसेच शिक्षक यांच्याशी शुक्रवार, दिनांक 1 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11.30 वाजता थेट संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम दिल्ली येथील टालकाटोरा स्टेडियमवर आयोजित करण्यात येणार असून ऑनलाईन पध्दतीने मा. पंतप्रधान संवाद साधणार आहेत. यावेळी विद्यार्थ्यांच्या ताणतणावाच्या व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासाठी ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात आपले प्रश्न, मत http://www.navodaya.gov.in/nvs/nvs-school/AMRAVATI/en/home/ या संकेतस्थळावर नोंदवावे.

तसेच संबंधितांना आपले विचारही या संकेतस्थळावर अपलोड करता येतील. हा कार्यक्रम दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, आकाशवाणीच्या सर्व राष्ट्रीय वाहिन्या, शिक्षा मंत्रालयाच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर एकाचवेळी प्रकाशित करण्यात येणार आहे, अशी माहिती नवोदय विद्यालयाचे प्राचार्य ससिंद्रन सि.के. यांनी दिली आहे.

          ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येनी विद्यार्थी, पालक तसेच शिक्षकांनी सहभागी होऊन या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 04-09-2025

  जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपाच्या ४५ पदांसाठी रोजगार मेळावा     अमरावती, दि. ४ : जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्त्वावरील ४५ पदांवर न...