Monday, March 21, 2022

महाडीबीटी संकेतस्थळावर नुतनीकरणाचे अर्ज सादर करण्यास 31 मार्चपर्यंत मुदतवाढ

 महाडीबीटी संकेतस्थळावर नुतनीकरणाचे अर्ज

सादर करण्यास 31 मार्चपर्यंत मुदतवाढ

अमरावती दि. 21 :-  माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत सन 2021-22 वर्षातील महाडीबीटी पोर्टलवर अनुसूचित जाती प्रवर्गासाठी नुतनीकरणाचे अर्ज व नवीन अर्ज भरण्यासाठी दि. 31 मार्च 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

 ऑनलाईन नुतनीकरणाचे अर्ज विहित मुदतीत भरण्यासाठी https://mahadbtmahait.gov.in   या महाडीबीटीच्या या संकेतस्थळाला भेट देऊन विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणीकृत करावे. याबाबत महाविद्यालयांनी त्रुटींची पूर्तता करून घ्यावी. विहित वेळेत अर्ज भरुन घेण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची राहील.  

महाडीबीटी संकेतस्थळावर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना तसेच महाविद्यालयांना नुतनीकरणाचे अर्ज भरुन रि-अप्लाय करण्यासाठी आणि सेंड बॅक केलेल्या अर्जाची त्रुटी पूर्तता करण्याचे आवाहन सहायक समाज कल्याण आयुक्त माया केदार यांनी केले आहे.

                                                               00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...