कामगारांची नोंदणी प्रक्रिया गतीने पुर्ण करावी - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकुर

 








कामगारांची नोंदणी प्रक्रिया गतीने पुर्ण करावी

-      पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकुर

 

कामगारांची आरोग्य तपासणी व किट वाटप  शिबिराचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सुरक्षा किटचे वाटप

 

          अमरावती दि29: बांधकाम क्षेत्रात कामगार हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. बांधकामाच्या ठिकाणी कामगारांची सुरक्षा ही अत्यंत महत्वाची बाब आहे. जिल्ह्यातील सर्व कामगारांची नोंदणी प्रक्रिया गतीने पूर्ण करून  तालुक्याच्या ठिकाणी शिबिर घेण्याबाबत नियोजन करण्यात यावे असे निर्देश जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी दिले.कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या सुविधा व विविध योजनांचा लाभ त्यांना देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

            नोंदणीकृत बांधकाम कामगारांकरीता आरोग्य तपासणी, माध्यान्ह भोजन, घरेलू कामगार नोंदणी, ई- श्रम कार्ड वाटप व अत्यावश्यक सुरक्षा किट वाटपाबाबत तिवसा येथे  शिबिराचे आयोजन करण्यात आले. कामगार विभाग, कामगार उपायुक्त कार्यालयाच्यावतीने आयोजित शिबिराचे उद्घाटन जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती पुजा आमले, पंचायत समिती सभापती शिल्पाताई हांडे, उपसभापती शरद वानखेडे, पंचायत समिती सदस्य सत्तार मुल्ला, निलेश खुळे, कल्पना दिवे, तिवसा नगराधक्ष्य योगेश वानखेडे, तहसिलदार वैभव फरतारे, नोंदणी अधिकारी अविकांत चौधरी, संजय धुर्वे, अर्चना कांबळे, नियंत्रक संजय पांडे आदी उपस्थित होते.

              तिवसा तालुक्यात 5 हजार 634 कामगारांची नोंदणी प्रक्रिया पुर्ण झाली असुन शिबीरात श्रीमती ठाकुर यांच्या हस्ते 300 कामगारांना अत्यावश्यक किटचे वाटप करण्यात आले. यावेळी तिवसा तालुक्यात कामगारांसाठी माध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत जेवणाच्या व्यवस्थेची त्यांनी माहीती घेतली. वीटभट्टी, बांधकामाच्या ठिकाणी कामगारांना वेळेत व सकस जेवण देण्याबाबत श्रीमती ठाकुर यांनी निर्देश दिले.

नोंदणी प्रक्रियेबाबत प्रशिक्षणाचे आयोजन करावे

        जास्तीत जास्त कामगाराची नोंदणी प्रक्रिया गतीने पुर्ण करण्यात यावी. नोंदणी प्रक्रियेबाबत तांत्रिक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात यावे. एकही कामगार नोंदणी प्रक्रिया व योजनांच्या लाभापासुन वंचित राहता कामा नये, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

अत्यावश्यक किटमधील सांधनांचा कामगारांनी वापर  करावा

           सुरक्षा किट मध्ये कामगारांसाठी बॅटरी, हेल्मेट, चटई, जेवणाचा डबा, रबरी बुट, दोरी, हातमोजे, मास्क, जॅकेट, हेडफोन इत्यादी वस्तुंचा समावेश आहे. या सर्व साधनांचा सर्व क्षेत्रिय ठिकाणी वेळोवेळी उपयोग करावा. संरक्षणार्थ असलेल्या या साधनांचा उपयोग  करतांना कामगारांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल, असा विश्वास श्रीमती ठाकुर यांनी यावेळी व्यक्त केला.

           यावेळी दिपक बिसेन, दिनेश चवळे, कविता चौधरी, सलिम शहा, अंकुश मेश्राम यांना ई-श्रम कार्ड व नलिनी मेश्राम, अंजु गवळी, तुळशीराम माहोरे, सय्यद खलिम, किशन कोल्हाट व शंकर चाकरे यांना सुरक्षा किटचे वाटप श्रीमती ठाकुर यांच्या हस्ते करण्यात आले.

 

000000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती