महिला व बालविकास मंत्री अंगणवाडीतील बालकांत रमल्या; बालकांशी दिलखुलास संवाद

 











महिला व बालविकास मंत्री अंगणवाडीतील बालकांत रमल्या; बालकांशी दिलखुलास संवाद

मंत्र्यांनी स्वतः मोजली अंगणवाडीतील बालकांची वजन, उंची

अमरावती,दि. 20: जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील कुर्‍हा येथील अंगणवाडीमध्ये प्रत्यक्ष जाऊन महिला आणि बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी आज बालकांची वजन आणि उंची स्वतः मोजली. तसेच अंगणवाडीतल्या या बालकांसोबत दिलखुलास संवादही साधत त्यांच्यात रमल्या.

 तिवसा तालुक्यातील कुऱ्हा येथील अंगणवाडीमध्ये महिला आणि बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर आज प्रत्यक्ष पोहोचल्या. अंगणवाडीतील बालकांच्या प्रकृतीविषयी आणि पोषणाविषयी त्यांनी अंगणवाडी सेविकांकडून माहिती जाणून घेतली. बालकांना पोषण आहार कशाप्रकारे दिला जातो आहे , या पोषणआहार यामुळे बालकांच्या प्रकृतीत कशी सुधारणा होते आहे याची स्वतः पाहणी करत ॲड. ठाकूर यांनी बालकांची स्वतः वजन आणि उंची मोजली. यावेळी त्यांनी चिमुकल्या बालकांशी मनमोकळे संवाद साधत त्यांना बोलते केले. काही बालकांना त्यांनी स्वतः उचलून घेतले आणि त्यांच्याशी जवळीक साधत त्यांच्यात रमल्या.  महिला आणि बालविकास मंत्र्यांच्या या प्रेमळपणामुळे अंगणवाडीतील बालकांसह अंगणवाडी सेविका ही भारावून गेल्या होत्या. अमरावती जिल्ह्याच्या महिला आणि बालकल्याण सभापती पूजाताई आमले यांच्यासह अनेक ग्रामस्थ आणि सरपंच यावेळी उपस्थित होते.

 

00000

 

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती