अनुसूचित जाती व नवबौध्द समाजासाठी मार्जिन मनी योजनेतंर्गत अर्ज आमंत्रित

 अनुसूचित जाती व नवबौध्द समाजासाठी 

मार्जिन मनी योजनेतंर्गत अर्ज आमंत्रित


अमरावती, दि.15 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त केंद्र शासनाने स्टॅन्ड अप इंडिया ही योजना जाहीर केली आहे. या योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांसाठी मार्जिन मनी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत नवउद्योजकांची मार्जीन मनी भरण्याची क्षमता नसल्यामुळे या उद्योजक लाभार्थ्यांना एकुण उद्योग प्रकल्पाच्या 25 टक्के स्वहिस्सामधील जास्तीत-जास्त 15 टक्के मार्जिन मनी शासनातर्फे उपलब्धकरून देण्यात येईल. 

या योजनेंतर्गत राज्यातील अनुसूचित जातीसाठी सवलती घेण्यास पात्र असलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील नवउद्योजकांना दहा टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित फ्रंट एण्ड सबसिडी 15 टक्के रक्कम शासनामार्फत देण्यात येते. 

या योजनेच्या मार्गदर्शक सूचना शासन स्तरावरून निश्चित करण्यात आल्या आहेत. हा शासन निर्णय www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर निरिक्षणासाठी उपलब्ध आहे. 

या योजनेसाठी इच्छुक लाभार्थ्यांनी अमरावती समाज कल्याण सहायक आयुक्त यांच्याकडे शासन निर्णयातील नमुद करण्यात आलेल्या सर्व अटी व शर्तीची पूर्तता करून प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त श्रीमती माया केदार यांनी केले आहे. 

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती