Tuesday, March 22, 2022

अमरावती शहरातील मौजा राजापेठ येथील सनद वाटप कार्यक्रम

 

अमरावती शहरातील मौजा राजापेठ येथील सनद वाटप कार्यक्रम

 

अमरावती दि. 22 : मा. उप संचालक भुमि अभिलेख अमरावती प्रदेश, अमरावती यांचे कडील अधिसुचना दिनांक 24.02.2022 अन्वये अमरावती शहरातील मौजा राजापेठ येथील नगर भुमापनाचे काम पूर्ण झालेले आहे. मौजा राजापेठ येथील 5900 मिळकतीचा नगर भुमापन अभिलेख उप अधीक्षक भुमि अभिलेख, अमरावती यांचे कार्यालयाचे विशेष उप अधीक्षक भुमी अभिलेख (शहर मापन) अमरावती यांनी उपलब्ध करुन दिलेला आहे.

            मौजा राजापेठ येथील 5900 मिळकत धारकांचे सनद वाटपाचे व सनद वसुलीचा कायक्रम दि 24.03.2022 लास सकाळी 9 वाजेपासून आरंभ करण्यात येत आहे. सदर कार्यक्रम सनद वाटपाचे काम पुर्ण होई पर्यंत नियमितपण सुरु राहणार आहे. तरी मौजा राजापेठ येथील नागरिकांनी त्यांच्या मिळकतीच्या सनद प्राप्त करुन घेऊन कार्यक्रमाचा लाभ घण्याबाबत भुमि अभिलेख विभागातर्फे नागरिकांना विनंती करण्यात येत आहे.

00000

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...