बोगस प्रमाणपत्रधारकांसाठी समर्पण योजना; क्रीडा विभागाचा उपक्रम

 

बोगस प्रमाणपत्रधारकांसाठी समर्पण योजना; क्रीडा विभागाचा उपक्रम


अमरावती, दि. 17 : बोगस क्रीडा प्रमाणपत्रधारकांसाठी समर्पण योजनेचा धोरणात्मक निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. त्यानुसार बोगस प्रमाणपत्रधारकांनी तत्काळ आपले प्रमाणपत्र व पडताळणी अहवाल जमा करावेत. ते जमा न करणा-यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा क्रीडा उपसंचालक विजय संतान यांनी दिला आहे.

 युवकांचे नुकसान टाळण्यासाठी समर्पण योजना

खेळाडूंना शासकीय व निमशासकीय सेवेत पाच टक्के आरक्षण आहे. काहींनी बोगस क्रीडा प्रमाणपत्र धारण करून पडताळणीही केली आहे. त्यात काहींनी शासकीय सेवेचा लाभही घेतला आहे. अशा व्यक्तींविरुद्ध कारवाई सुरू करण्यात येत आहे. दरम्यान, युवक उमेदवारांचे नुकसान होऊ नये व त्यांना भविष्यात अडचण निर्माण होऊ नये म्हणून प्रमाणपत्र समर्पण योजना राबविण्यात येत आहे.

गोपनीयता राखली जाईल

ज्या उमेदवारांनी क्रीडा संचालनालय व विभागीय क्रीडा उपसंचालक कार्यालय आदींकडून विविध खेळांच्या बोगस क्रीडा प्रमाणपत्रांची पडताळणी करून घेतली असेल किंवा त्याआधारे नोकरी मिळवली असेल, अशा उमेदवारांनी मूळ क्रीडा प्रमाणपत्र व पडताळणी अहवाल आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, शिवछत्रपती क्रीडापीठ, म्हाळुंगे बालेवाडी, पुणे यांच्याकडे व्यक्तिश: किंवा पत्राद्वारे दि. 31 मे 2022 पूर्वी समर्पित करावीत. उमेदवारांची नावे गोपनीय ठेवण्यात येतील.

मुदतीत बोगस प्रमाणपत्रे व मूळ क्रीडा प्रमाणपत्रे, पडताळणी अहवाल जमा न केल्यास उमेदवार व संबंधित क्रीडा संघटनेविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती