जागतिक जलदिनानिमित्त शहरात आज जलदिंडी

 जागतिक जलदिनानिमित्त शहरात आज जलदिंडी

अमरावती, दि. 21 : जलसंपदा विभागातर्फे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशन व इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स यांच्या सहकार्याने जागतिक जलदिनानिमित्त उद्या, दि. 22 मार्च रोजी शहरात जलदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. मालटेकडीवरील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालय परिसरात सकाळी 7 वाजता जलदिंडीचा आरंभ होऊन, अभियंताभवन येथे सकाळी 10 वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सांगता कार्यक्रम होणार आहे.

  

जलजागृती सप्ताह संपूर्ण महाराष्ट्रात 16 ते 22 मार्चदरम्यान साजरा करण्यात येत असून, विविध कार्यक्रम घेण्यात आले. या सप्ताहाचा समारोपानिमित्त जलदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या हस्ते मालटेकडी येथे सकाळी 7 वाजता जलदिंडीचा शुभारंभ होईल. त्यानंतर इर्विन चौक येथे दिंडी पोहोचून सकाळी 7.30 वाजता जलजागृतीविषयक व्याख्यान व पथनाट्य होणार आहे. पंचवटी चौक येथे सकाळी 8.30 वाजता पथनाट्याचा कार्यक्रम होईल. अभियंताभवन येथे दिंडीचा समारोप होणार आहे.

यावेळी समारोप सोहळ्याला पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर, जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू, मुख्य जलसंपदा अभियंता अ. ना. बहादुरे, मुख्य अभियंता (वि. प्र.) अ. ल. पाठक, मुख्य अभियंता एस. एस. गव्हाणकर, जिल्हाधिकारी पवनीत कौर आदी उपस्थित राहतील.

जलदिंडी कार्यक्रमात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन उर्ध्व वर्धा सिंचन मंडळाच्या अधिक्षक अभियंता रश्मी देशमुख, पाटबंधारे प्रकल्प मंडळाच्या अधिक्षक अभियंता मेघा अक्केवार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिक्षक अभियंता विवेक सोळंके यांनी केले आहे.

000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती