भारतीय सशस्त्र सैन्य दलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणासाठी 22 मे रोजी मुलाखत

 

भारतीय सशस्त्र सैन्य दलामध्ये अधिकारी पदाच्या

पूर्व प्रशिक्षणासाठी 22 मे रोजी मुलाखत

 

अमरावती, दि. 18 : राज्यातील नवयुवक व नवयुवतींसाठी भारतीय सैन्यदल, नवदल व वायुदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणासाठी 29 मे ते 7 जून 2023 या कालावधीमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या प्रशिक्षणामध्ये सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (एस.एस.बी.) या परीक्षेची पूर्वतयारी करुन घेण्यात येईल. यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे एस.एस.बी. कोर्स क्र. 53 आयोजित करण्यात येत आहे. या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाच्या संधीचा लाभ घेण्यासाठी अमरावती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे सोमवार दि. 22 मे 2023 रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येतेवेळी त्यांनी फेसबुक पेजवर डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेलफेअर, पुणे (डीएसडब्लू) वर सर्च करुन त्यामधील एस.एस.बी.-53 प्रशिक्षणासाठी प्रवेशपत्र व त्यासोबत असलेल्या परिशिष्ठांची प्रिंट घेऊन ते परिपूर्ण भरुन सोबत घेऊन यावे.

एस.एस.बी. कोर्समध्ये प्रवेश मिळाविण्यासाठी पुढीलपैकी एक पात्रता आवश्यक आहे. संबंधीत पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येतांना घेऊन यावे. यामध्ये कंबाईन्ड डिफेंन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन अथवा नॅशनल डिफेंन्स अकॅडमी एक्झामिनेशन पास झालेली असावी. व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. किंवा एनसीसी ‘सी’ सर्टिफिकेट ‘ए’ किंवा ‘बी’ ग्रेडमध्ये पास झालेले असावेत. तसेच एनसीसी ग्रुप हेड कॉर्टरने एस.एस.बी. साठी शिफारस केलेली असावी. अथवा टेक्निकल ग्रॅज्युएशन कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. किंवा युनिर्व्हरसिटी एन्ट्री स्किमसाठी एस.एस.बी. कॉल लेटर असावे. किंवा एस.एस.बी.साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ई-मेल पत्ता pctcoic@yahoo.in व दूरध्वनी क्रमांक 0253-2451032 यावर संपर्क साधण्याचे आवाहन अमरावती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती