गुरुकुंजात प्रार्थनेला वन मंत्र्यांची उपस्थिती विवेकपूर्ण जीवनपद्धतीसाठी राष्ट्रसंतांचे विचार अंगिकारणे आवश्यक - वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

 

















गुरुकुंजात प्रार्थनेला वन मंत्र्यांची उपस्थिती

विवेकपूर्ण जीवनपद्धतीसाठी राष्ट्रसंतांचे विचार अंगिकारणे आवश्यक

- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

 

       अमरावती, दि. २० : धावपळीच्या व स्पर्धेच्या आजच्या युगात  मनःशांती, तणाव निरसन, विवेकपूर्ण जीवनपद्धतीसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार अंगिकारणे आवश्यक आहे. त्यासाठी ग्रामगीतेचे नियमित पठण, प्रार्थना व भजन आदींचा समावेश आपल्या जीवनशैलीत व्हावा, असे आवाहन वन व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

 

       श्री मुनगंटीवार यांनी आज पहाटे गुरुकुंज मोझरी आश्रमाला भेट देऊन प्रार्थनेत सहभाग घेतला. येथील सर्व तीर्थकुंडात मंत्री श्री. मुनगंटीवार यांचे वडील कै. सच्चिदानंद मुनगंटीवार यांच्या अस्थिंचे विसर्जन करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळाचे सर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे, उप सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ, सरचिटणीस जर्नादन बोथे गुरुजी, सुभाष सोनारे, निवेदिता चौधरी यांच्यासह आश्रमाचे सदस्य व सेवेकरी यावेळी उपस्थित होते.

 

प्रारंभी मंत्री महोदयांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या स्मारकाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी सामुहीक प्रार्थनेत सहभाग घेऊन ध्यानसाधना केली. कारे धरी गिरीधारी अबोला, नको वेळ लावू प्रभू भेटण्याला, सबका भला करो, यही आवाज कहेंगे या भजनगीतांचे गायन झाले. भगवद्गगीतेच्या अध्यायाचे पठन, प्रभु श्रीरामाचा जयघोष झाला.

 

यावेळी मंत्री महोदयांनी श्री गुरुदेव जीवन विद्या सुसंस्कार व छंद शिबिराला व श्री गुरुदेव आयुर्वेदीक महाविद्यालयाला भेट देऊन पाहणी केली. या शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले.

 

यावेळी शिबिरातील विद्यार्थ्यांव्दारे खंजिर वाजवून हनुमान चालीसाचे सादरीकरण झाले. खंजीराच्या वादन ऐकून मन प्रसन्न झाले. ते म्हणाले, आनंदाचा महामार्ग दाखवणिऱ्या राष्ट्रसंतांच्या भूमीत आपण जन्मला आहात. तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात. सुदृढ मनासाठी व सकारात्मक विचारांसाठी भजन आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

 

0000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती