आसमंतात निनादले 'गर्जा महाराष्ट्र माझा' चे सूर महाराष्ट्र दिनाचा सोहळा उत्साहात

 




















आसमंतात निनादले 'गर्जा महाराष्ट्र माझा' चे सूर

महाराष्ट्र दिनाचा सोहळा उत्साहात

 

        अमरावती, दि. १ : राष्ट्रगीत व 'गर्जा महाराष्ट्र माझा'च्या मंगलमय सुरांत महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६३ वा वर्धापन दिन सोहळा जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर उत्साहात साजरा झाला. मुख्य शासकीय सोहळ्यात प्र. विभागीय आयुक्त षण्मुगराजन एस. यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

           यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, जिल्हाधिकारी पवनीत कौर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस अधिक्षक (ग्रामीण) अविनाश बारगळ यांच्यासह अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते.

           राष्ट्रध्वज वंदन, राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीतानंतर विभागीय आयुक्तांनी मैदानावर उघड्या जीपमधून फेरी मारून पोलीस, विविध सुरक्षा दलांच्या व विभागांच्या पथकांचे निरीक्षण केले. त्यानंतर विविध सुरक्षा दलांच्या जवानांनी पथसंचलन करून मानवंदना दिली.

       यावेळी विभागीय आयुक्तांच्या हस्ते विविध गुणवंत अधिकारी व कर्मचा-यांना गौरविण्यात आले. तसेच शासनाकडून विविध पदांसाठी निवड झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्रांचे वितरणही त्यांच्या हस्ते करण्यात आले.

 

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती