गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेसाठी अशासकीय संस्थांनी प्रस्ताव सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

 

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेसाठी अशासकीय

संस्थांनी प्रस्ताव सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

 

अमरावती, दि. 18 : महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागांतर्गत गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना पुन्हा सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये धरणामध्ये साचलेला गाळ उपसा करुन धरणाची मूळ साठवण क्षमता पुर्न:स्थापित होणार आहे. तसेच उपसा केलेला गाळ शेतात पसरविल्यास शेताची उत्पादन क्षमता वाढून कृषी उत्पन्नात वाढ होणार आहे. तरी धरणातील गाळ उपसा करण्यासाठी जास्तीत जास्त अशासकीय संस्थांनी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.

            या योजनेंतर्गत काम करणाऱ्या अशासकीय संस्था यांना यंत्रसामग्री आणि इंधन या दोन्हीचा खर्च देणे प्रस्तावित आहे. तसेच अल्प व अत्यल्पभूधारक, विधवा, अपंग व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल यासाठी अनुदान देण्यात येणार आहे. अशासकीय संस्थांना गाळ काढण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री आणि इंधन यासाठी 31 रुपये प्रति घनमीटर व पात्र शेतकऱ्यांना शेतात गाळ पसरविण्यासाठी 35.75 रुपये प्रति घनमीटर प्रमाणे प्रति एकर 15 हजार रुपयाच्या मर्यादित व 2.5 एकरसाठी 37 हजार 500 रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे.

            या योजनेंतर्गत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या अशासकीय संस्था यांनी तालुका निहाय संबंधित उपविभागीय जलसंधारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. मृद व जलसंधारण विभागाच्या अखत्यारित असलेल्या जलसाठ्यांची माहिती घेऊन संबंधीत ग्रामपंचायतीचे ठरावासोबत सदस्य सचिव, जिल्हास्तरीय समिती, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजना तथा जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, जलसंपदा परिसर, जेल रोड, अमरावती कॅम्प 444602 येथे प्रस्ताव सादर करावेत. या प्रस्तावात जलसाठ्यामध्ये अंदाजे उपलब्ध गाळाचा प्रमाणाचा उल्लेख असणे बंधनकारक आहे.

            मृद व जलसंधारण उपविभागीय अमरावती-समाविष्ट तालुके अमरावती, तिवसा, भातकुली, उपविभागीय नांदगाव खंडेश्वर-समाविष्ट तालुके- नांदगाव खंडेश्वर, चांदुररेल्वे, धामणगाव रेल्वे, उपविभागीय दर्यापूर समाविष्ट तालुके-दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, उपविभाग चांदुर बाजार-समाविष्ट तालुके-चांदुर बाजार, अचलपूर, उपविभाग धारणी-समाविष्ट तालुके-धारणी, चिखलदरा, उपविभाग मोर्शी-समाविष्ट तालुके मोर्शी आणि वरुड आहे.

            मृद व जलसंधारण विभाग, अमरावती विभागाच्या अखत्यारित अमरावती हा एक जिल्हा येत असून अभियानाध्ये सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या अशासकीय संस्था यांनी तालुकानिहाय संबंधित उपअभियंता यांच्याशी संपर्क साधावा. संबंधित ग्रामपंचायतीच्या ठरावासोबत सदस्य सचिव, जिल्हास्तरीय समिती, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना तथा जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, जलसंपदा परिसर, जेल रोड, अमरावती कॅम्प 444602 यांना सादर करावे.

            जिल्हास्तरीय समितीमार्फत संबंधित प्रस्तावावर वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या सूचनांच्या अनुषंगाने संबंधित संस्थांची पात्रता व क्षमता तपासून एका जलसाठ्यासाठी एक संस्थेस कार्यकारी यंत्रणा व नमूद केलेल्या गाळाचे प्रमाण उपसण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात येईल. यानंतर पुढील कार्यवाही उपअभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे.

            गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत धरणातील गाळ उपसा करण्यासाठी जास्तीत जास्त अशासकीय संस्थांनी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती