दुचाकीस्वारांना हेल्मेट बंधनकारक

दुचाकीस्वारांना हेल्मेट बंधनकारक

    अमरावती, दि. 22: अमरावती जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय महामंडळे, महानगरपालिका, नगरपालिका व सर्व शासकीय आस्थापना तसेच खाजगी आस्थापना यांनी त्यांच्या आस्थापनेत काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांना तसेच कार्यालयात येणाऱ्या सर्व दुचाकी चालक व मागे बसून येणाऱ्या व्यक्तीस “संरक्षक शिरस्त्राण” ( हेल्मेटपरिधान करणे बंधनकारक आहे. शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, खाजगी आस्थापनेतील अधिकारी व कर्मचारी तसेच वरील आस्थापनेत येणाऱ्या सर्व दुचाकीस्वारांना हा नियम लागू राहील, याची नोंद घेण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी आर. टी. गित्ते यांनी केले आहे.

जिल्ह्यातील होणाऱ्या अपघातात, मोटार सायकलचे अपघात व त्यात मृत्यू होण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहेत. मोटार वाहन कायदा व महाराष्ट्र मोटार वाहन नियमाची प्रभावी अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. मोटार वाहन कायदा, 1988 च्या कलम 129 सह 194 (ड) नुसार दुचाकी वाहन चालक व त्याच्यामागे बसून प्रवास करणाऱ्या चार वर्षावरील सर्व व्यक्तीस भारत मानक संस्थेने ठरवून दिलेल्या प्रमाणकानुसार  ‘संरक्षण शिरस्त्राण (हेल्मेट)’  वापरणे बंधनकारक आहे. ‘ संरक्षक ‍शिरस्त्राण’ परिधान न केलेल्या दुचाकी चालक व मागे बसलेल्या व्यक्तीविरूध्द मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 129/177, 250(1) नुसार तसेच कलम 194 (3) अन्वये संबंधित आस्थापना प्रमुख यांचे विरूध्द गुन्हा नोंद करून एक हजार रूपये दंड तसेच वाहनधारकाची अनुज्ञप्ती 3 महिन्यांसाठी निलंबित करण्यात येईल .

            महाराष्ट्र मोटार वाहन नियम, 1989 कलम 250 नुसार राज्य महामार्ग व राष्ट्रीय महामार्ग या व्यतिरिक्त इतर रस्त्यांवर 50 क्युबिक सेंटीमीटरपेक्षा कमी इंजिन असलेले मोपेड व पगडी परिधान केलेले शिख समुदायातील व्यक्ती यास अपवाद राहतील. मोटार वाहन कायदा, 1988 चे कलम 194 (ड) अन्वये वाहनधारकाने  नियम 129 चे उल्लंघन केल्यास तो स्वत: तसेच ज्या आस्थापनामधील जागेवर गुन्हा घडला आहे, त्या आस्थापनेचे प्रमुख उपरोक्त उल्लंघनास जबाबदार राहतील.

00000

 

 


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती