महात्मा फुले महामंडळाची कर्ज व प्रशिक्षण योजना

 महात्मा फुले महामंडळाची कर्ज व प्रशिक्षण योजना  

 

          अमरावती, दि. 25 : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयमार्फत महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या कर्ज, अनुदान योजनेंतर्गत सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्यातील अनुसूचित जाती मधील पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिला जाईल. या योजनेंतर्गत 180 कर्ज प्रकरणांचे भौतिक व आर्थिक उद्दिष्ट तसेच प्रशिक्षण योजनेंतर्गत 360 प्रशिक्षणाचे उद्दिष्ट प्राप्त आहे. यासाठी अनुसूचित जाती, नवबौध्द संवर्गातील पात्र अर्जदारांनी कर्ज, अनुदानासाठी विहित नमुन्यातील अर्ज सादर करावे. अर्जासह जाती, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, पासपोर्ट फोटो, आधार व रेशन कार्ड, दरपत्रक तसेच प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या पात्र व्यक्तींचे शैक्षणिक खंड प्रमाणपत्र आवश्यक आहे. 

          अर्जासह परिपूर्ण प्रस्ताव 31 ऑगस्ट 2023 पूर्वी महामंडळाच्या जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पोलीस आयुक्त कार्यालया मागे, चांदुररेल्वे रोड, अमरावती येथे सादर करण्याचे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे. 

0000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती