Thursday, May 4, 2023

आयआयएमसीत मराठी पत्रकारिता प्रवेश प्रक्रिया सुरू

 

आयआयएमसीत  मराठी पत्रकारिता प्रवेश प्रक्रिया सुरू

२२ मे पर्यंत अर्ज करू शकतात

आयआयएमसी देशातील सर्वात प्रतिष्ठित माध्यम शिक्षण संस्था आहे

 

अमरावती : भारतीय जन संचार संस्थान (IIMC) मध्ये मराठी पत्रकारिता डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. शैक्षणिक सत्र २०२३-२४ साठी आयोजित या प्रवेश प्रक्रियेत अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २२ मे २०२३  आहे. प्रवेश अर्ज संस्थान च्या अधिकृत वेबसाइट www.iimc.gov.in वर उपलब्ध आहे.

आयआयएमसीच्या अधिकृत वेबसाइट वरून विद्यार्थांनी प्रवेश अर्ज डाउनलोड करून भरणे आवश्यक आहे. भरलेल्या अर्जाची प्रत पोस्टाद्वारे पाठविणे अनिवार्य आहे. मराठी पत्रकारिता डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अर्ज सादर केल्यानंतर विद्यार्थ्यांना कॉमन एंट्रन्स टेस्ट (CET) द्वारे प्रवेश मिळेल. ही परीक्षा १८ जून रोजी भारतीय जन संचार संस्थानच्या अमरावती विद्यापीठ परिसरातील पश्चिम क्षेत्रीय केंद्रावर आयोजित करण्यात येणार आहे.

         मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त विद्यार्थी आयआयएमसीमध्ये प्रवेशासाठी अर्ज करू शकतात.जे विद्यार्थी त्यांच्या बॅचलर पदवीच्या अंतिम वर्षात किंवा सेमिस्टर परीक्षेत बसले आहेत किंवा जे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत ते देखील अर्ज करण्यास पात्र आहेत. निवड झाल्यावर, अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या तात्पुरत्या मार्कशीटची किंवा प्रमाणपत्राची मूळ प्रत 30 सप्टेंबर 2023 पर्यंत सादर करावी लागेल. प्रवेश करिता वयोमर्यादा निश्चित करण्यात आली असून खुल्या प्रवार्गासाठी २५ वर्ष, ओबीसी करिता २८ वर्ष तर अनुसूचित जाती / जमाती आणि दिव्यांग उमेदवारा करिता ३० वर्ष आहे.

           इच्छुक उमेदवारांनी प्रवेश परीक्षेशी संबंधित अपडेटसाठी आयआयएमसीच्या वेबसाइटला भेट देत राहण्याचा सल्ला प्रवेश प्रभारी प्रो. राकेश गोस्वामी यांनी दिला आहे. प्रवेश प्रक्रिया संबंधी अधिक माहितीसाठी किंवा अडचणी संदर्भात विद्यार्थांनी प्रा. अनिल जाधव (9422857060), डॉ. राजेश कुशवाहा (9415862377), डॉ. विनोद निताळे (9860046706), डॉ. आशिष दुबे (9923196709), संजय पाखोडे (9823023875) राजेश झोलेकर (9881388645) यांच्याशी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा. विद्यार्थ्यांना व्हॉट्सअ‍ॅपद्वारे माहिती मिळवायची असल्यास सदर मोबाईल क्रमांकावर संदेश पाठवू शकतात, अशी माहिती संस्थानचे क्षेत्रीय संचालक प्रा. डॉ. वीरेंद्र कुमार भारती यांनी दिला आहे.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...