Monday, May 1, 2023

‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’चा शुभारंभ

 







‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाचा शुभारंभ

अमरावती, दि. 1 : गरीब व गरजू रूग्णांसाठी राज्यात ठिकठिकाणी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाचा डिजीटल शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. अमरावती येथे चपराशीपुरा परिसरातील उर्दू विद्यालयात जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते आपला दवाखान्याचा शुभारंभ झाला. 

राज्यात ३१७ ठिकाणी महाराष्ट्रदिनाच्या मुहुर्तावर आपला दवाखाना उपक्रमाचा प्रारंभ झाला. अमरावती येथील कार्यक्रमाला अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी रिचर्ड यांथन, महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष ढोले आदी उपस्थित होते.

आपला दवाखाना उपक्रमामुळे गोरगरीब, कष्टकरी, तसेच झोपडपट्टी भागात राहणा-या नागरिकांना विनामूल्य आरोग्य सुविधांचा लाभ मिळणार आहे. प्रत्येक तालुक्यात एक दवाखाना उघडण्यात येत आहे. या दवाखान्यामुळे गोरगरीबांसाठी एक उत्तम आरोग्य सुविधा निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पंडा यांनी केले.

या दवाखान्यात विविध आजारांवरील उपचारांसह डोळ्यांची तपासणी, मानसोपचार, लसीकरण, औषधोपचार आदी विविध सुविधा उपलब्ध असतील, अशी माहिती डॉ. ढोले यांनी दिली.  कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...