मधमाशापालकांना मिळणार ग्रामोद्योग मंडळातर्फे 'मधुमित्र' पुरस्कार

 मधमाशापालकांना मिळणार  ग्रामोद्योग मंडळातर्फे

'मधुमित्र' पुरस्कार

 

अमरावती, दि. ८ :  राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने राज्यातील मधमाशीपालनाला  प्रोत्साहन मिळण्यासाठी उत्कृष्ट मधमाशीपालकांना यंदा राज्यस्तरीय मधुमित्र पुरस्कार देण्यात येणार आहे, असे मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी नुकतेच जाहीर केले.

राज्याचे खादी व ग्रामोद्योग मंडळ  मधमाशीपालनाच्या विविध योजना राबवित आहे. राज्यात मधमाशीपालनाला खूप मोठा वाव आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मधमाशीपालनाकडे वळावे तसेच याबाबत लोकांच्यात जनजागृती व्हावी आणि मधमाशापालनाला प्रोत्साहन  मिळावे यासाठी यावर्षी पासून मधुमित्र या पुरस्कारांची घोषणा केली आहे.

पुरस्कारांचे वितरण दि. २० मेस जागतिक मधमाशीदिनानिमित्त महाबळेश्वर येथील मध संचलनालय  येथे होणार आहे. या पुरस्कारामध्ये रोख रक्कम, शाल श्रीफळ व सन्मान पत्र याचा समावेश आहे. मधमाशा पालनात भरीव काम करणाऱ्या महिला व पुरुष मधपाळांचा समावेश यामध्ये करण्यात येणार आहे.या पुरस्कारांसाठी जास्तीत जास्त मधपालकांनी अर्ज करावे असे आवाहन सभापती श्री. साठे यांनी केले आहे.

खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या सर्व जिल्हा कार्यालयांत पुरस्कारासाठी अर्ज उपलब्ध आहेत. हे अर्ज पाठवण्याची अंतिम मुदत १२ मे पर्यंत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : श्री. डी.आर.पाटील ( 94238 62919), श्री. पी. के. आसोलकर ( 8208497189 )

 

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती