अवैध वाळू उत्खननावर, भरारी पथकाची नजर रेतीघाटांची तपासणी सुरू अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कडक कारवाईचे जिल्हाधिका-यांचे निर्देश

 

अवैध वाळू उत्खननावर, भरारी पथकाची नजर

रेतीघाटांची तपासणी सुरू

अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कडक कारवाईचे जिल्हाधिका-यांचे निर्देश

 

अमरावती, दि. 25 : जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाळूचे अवैध उत्खनन व वाहतुकीला आळा घालण्यासाठी भरारी पथकांची स्थापना करण्यात आली असून, कुठेही अवैध उत्खनन होत असल्याचे आढळल्यास कठोर कारवाई करण्याचे निर्देश प्र. जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी दिले आहेत.

जिल्ह्यात वाळू डेपो अद्याप सुरू झालेले नसल्याने अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीला प्रतिबंधासाठी तालुका स्तरावर किमान 2 किंवा आवश्यकतेनुसार त्यापेक्षा अधिक भरारी, दक्षता व कृती पथके, तसेच उपविभागीय स्तरावरही भरारी व निरीक्षण पथके कार्यान्वित करण्याबाबत सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना निर्देश देण्यात आले आहेत.  जिल्हा स्तरावरही विशेष पथकांची स्थापना करण्यात आली असून, सर्व रेतीघाटांची तपासणी सुरु करण्यात आली आहे.

वाळूचे अवैध उत्खनन व वाहतूक कुठेही होता कामा नये. उपविभागीय अधिका-यांनी स्वत: या बाबीचे संनियंत्रण करावे. भरारी पथकांनी सातत्याने निगराणी ठेवावी. तपासणी व कार्यवाहीत हयगय होता कामा नये. संबंधित अधिकारी व कर्मचारी यांचे दुर्लक्ष होत असल्याचे निष्पन्न झाल्यास जबाबदारी निश्चित करून कारवाई प्रस्तावित केली जाईल, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.

भरारी पथकांना आवश्यक सशस्त्र मनुष्यबळ पुरविण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिका-यांना दिले आहेत. पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळू व रेती उत्खननाबाबत कारवाईसाठी महसूल पथकांना सशस्त्र मनुष्यबळ विनाविलंब पुरविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती