अनाथ मुलीच्या नातेवाईकांनी 30 दिवसांच्या आत संपर्क साधावा बाल कल्याण समितीचे आवाहन

 

अनाथ मुलीच्या नातेवाईकांनी 30 दिवसांच्या आत संपर्क साधावा

 बाल कल्याण समितीचे आवाहन

 

          अमरावती, दि. 26 : बाल कल्याण समितीच्या माहितीनुसार कु. पूजा मानसिंग डुमाला, वय 8 वर्षे 10 महिने या  बालिकेची आई गावाला जाऊन येते, असे सांगून निघून गेली. ती आजपर्यंत परत आली नाही. याबाबत परतवाडा पोलीसांनी शोध घेऊन चौकशी केली असता बालिकेच्या आईबाबत वरीलप्रमाणे माहिती मिळाली. तसेच बालिकेच्या वडिलांची आर्थिक व सामाजिक परिस्थिती या बालिकेचा सांभाळ करण्यास सक्षम नाही, असे सांगितले. त्यानुसार या बालिकेची काळजी व संरक्षणासाठी बाल शिक्षण केंद्र (मुलींचे बालगृह), अमरावती येथे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर ही बालिका 6 वर्षाची झाल्यानंतर पुढील पुनर्वनासाठी बालगृह होलीक्रॉस, कॉन्वेंट, परतवाडा येथे दाखल करण्यात आले.

        बालिका पूजा मानसिंग डूमाला वय 8 वर्षे 10 महिने हिच्या आई-वडील व नातेवाईकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी निवेदन प्रसिध्द झाल्यापासून तीस  दिवसांच्या आत बालगृह होलीक्रॉस, कॉन्वेंट, परतवाडा येथे  9699132123 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. बाल कल्याण समिती, अमरावती किंवा जिल्हा बाल संरक्षण कक्ष, अमरावती किंवा परतवाडा पोलीस स्टेशन, परतवाडा, यांच्याशी संपर्क साधावा. दिलेल्या कालावधीमध्ये संपर्क न केल्यास बालिकेचे सर्वोत्तम हित लक्षात घेता तिचे पुनर्वसन केल्यावर कुणाचाही दावा राहणार नाही. ह्याची दखल घ्यावी, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी केले आहे.

00000

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती