तलाव पुनरूज्जीवनासाठी राबविणार मोहिम जलशक्ती रथाचा जिल्हाधिका-यांच्या हस्ते शुभारंभ

 




तलाव पुनरूज्जीवनासाठी राबविणार मोहिम

जलशक्ती रथाचा जिल्हाधिका-यांच्या हस्ते शुभारंभ

 

अमरावती, दि. 15 : तलावांचे पुनरूज्जीवन व जलयुक्त शिवार योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जनजागृतीच्या उद्देशाने जलशक्ती रथाचा जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून झाला. भारतीय जैन संघटनेच्या सहकार्याने हा जलशक्ती रथ संपूर्ण जिल्ह्यात फिरून पाण्याच्या संवर्धनाबाबत जनजागृती करणार आहे. जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांच्या हस्ते जागृतीपर पत्रकाचे प्रकाशनही यावेळी झाले.

 

जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी दिलीप निपाणे, उपजिल्हाधिकारी राम लंके, जिल्हा जलसंधारण अधिकारी संजय जाधव, नोडल ऑफिसर सोनाली कोकाटे, भारतीय जैन संघटनेचे सुदर्शन जैन, प्रदीप जैन, ऋषभ भरडिया,  संजय अंचालिया, सामाजिक कार्यकर्ते गोविंद कासट, नितीन राजवैद्य आदी उपस्थित होते.

 

हवामानामध्ये तीव्र गतीने बदल होत चालले आहेत. पाऊस पडणे बेभरवशाचे झाले आहे. या संकटाला सामोरे जायचे असेल तर प्रत्येक गावाने पाण्यासाठी आत्मनिर्भर होण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने गावोगाव जलयुक्त शिवार योजना, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी रथाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. भारतीय जैन संघटना पुढाकार घेऊन जलसंवर्धनाच्या महत्वपूर्ण कामात योगदान देत आहे हे कौतुकास्पद असल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी सांगितले.

00000

 

 

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती