आय.आय.एच.टी. बरगढ व वेंकटगिरी येथे प्रथम सत्रासाठी २० जूनपर्यंत अर्ज आमंत्रित

 

आय.आय.एच.टी. बरगढ व वेंकटगिरी येथे प्रथम सत्रासाठी

२० जूनपर्यंत अर्ज आमंत्रित

 

अमरावती,दि. २६ : केंद्र शासनाच्या भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेतील सन २०२३-२४ या शैक्षणिक सत्रासाठी तीन वर्षीय (सहा सत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यास क्रमाच्या प्रथम सत्राकरिता महाराष्ट्र राज्यातून बरगढ (ओडिशा) करीता १३ जागा व आर्थिकदृष्या दुर्बल घटकासाठी १ जागा तसेच वेंकटगिरी करीता २ जागेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.  प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर, सोलापूर, मुंबई व औरंगाबाद यांच्यामार्फत विहित नमुन्यात प्रवेश अर्ज दिनांक २० जूनपर्यंत मागविण्यात येत आहे.

इच्छुक उमेदवारांनी याबाबतचे आपले परिपूर्ण अर्ज दिनांक २० जूनपर्यंत प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर कार्यालयाकडे सादर करावे. प्रवेश अर्जाचा नमूना व अन्य माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे http.www.dirtexmah.gov.in वर उपलब्ध आहे. तसेच अर्जाचा नमूना प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर यांचे कार्यालयात देखील उपलब्ध आहे, असे  वस्त्रोद्योग आयुक्त एम. जे. प्रदिप चंदन यांनी कळविले आहे.

विदर्भातील ११ जिल्हयातील पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा नमूना व अन्य माहिती प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग,  प्रशासकीय इमारत क्रं. २, ८ वा माळा, "बि" विंग, सिव्हील लाईन्स, नागापूर - ४४०००१ तसेच दुरध्वनी क्रमांक ०७१२-२५३७९२७ यांकडून प्राप्त करून घ्यावा. तसेच विहित पात्रता व अर्जाचा नमुना कार्यालयाच्या सूचना  फलकावर लावण्यात आलेला असल्याचे वस्त्रोद्योग विभागाने कळविले आहे .                 

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती