Thursday, May 4, 2023

ध्वनिक्षेपक वापरासाठी शुक्रवारी सवलत

 

ध्वनिक्षेपक वापरासाठी शुक्रवारी सवलत

अमरावती, दि.४: शहर पोलीस आयुक्त कार्यालयाकडून निर्गमित अधिसूचनेमध्ये विविध धार्मिक सणांकरिता सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनी वापर मर्यादेचे पालन करून वाद्य, ध्वनिक्षेपक वापरास सूट जाहीर करण्यात आली आहे. यात उद्या, शुक्रवार, दिनांक ५ मे २०२३ रोजी साजरे होणाऱ्या 'बुद्ध पौर्णिमा' या सणाचा समावेश करण्यात आला आहे.

शुक्रवारी बुद्ध पौर्णिमा या सणाकरिता पोलीस आयुक्तालय, अमरावती शहर या कार्यक्षेत्रात ध्वनिक्षेपक वापराकरिता सवलत जाहीर केली आहे. यासाठी ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण ) नियम, २०१७ चे नियम पाच मधील सुधारित उपनियम (३ )नुसार सवलत देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी पवनीत कौर यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे .

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...