Friday, May 26, 2023

मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या विविध शिष्यवृत्तीच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रीयेस 30 मे पर्यंत मुदतवाढ

 मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या विविध शिष्यवृत्तीच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रीयेस 30 मे पर्यंत मुदतवाढ

डीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरण्याचे समाज कल्याण आयुक्त यांचे आवाहन

अमरावती, दि. 26 : अमरावती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या विविध मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनांकरीता सन 2022-23 मध्ये नवीन व नुतनीकरण अर्ज करण्याच्या प्रक्रियेस 30 मे 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळाचा वापर करून अर्ज भरण्याचे आवाहन विभागा कडुन करण्यात येत आहे.

राज्यातील सर्व शासनमान्यता प्राप्त अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालये प्राचार्य व महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती (sc), विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. सन 2022-23 या वर्षासाठी प्रलंबित असलेले मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी परीक्षा फी व्यावसायिक पाठयक्रमास प्रवेशित विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेशित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती इ. नवीन व नुतनीकरण (Renewal) चे अर्ज भरता येणार आहेत.

प्रलंबित शिष्यवृत्तीचे अर्ज निकाली काढणे करीता यापूर्वी 30 एप्रिल 2023 ही अंतिम दिनांक देण्यात आलेली होती. परंतु प्रतिवर्षीची नोंदणीकृत अर्ज संख्या लक्षात घेता या वर्षीची अर्ज संख्या तुलनेत कमी असून विद्यार्थ्यांचे अर्ज नोंदणी प्रलंबित असल्याने सन 2022-23 चे नवीन अर्ज व नुतनीकरण (Fresh / Renewal) व सन 2021-22 चे नोंदणीकृत केलेले अर्ज Re- apply करण्याची मुदत 30 मे 2023 पर्यंत देण्यात आलेली आहे. तरी सर्व संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य, शिष्यवृत्तीचे कामकाज पाहणारे कर्मचारी व शिष्यवृत्ती धारक पात्र विद्यार्थी यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज अचूक भरुन मंजूरीसाठी समाज कल्याण कार्यालयास प्रथम प्राधान्याने विहीत मुदतीत ऑनलाईन सादर करावेत.

त्याच प्रमाणे ज्या विद्यार्थ्यांनी महाडिवीटीवर यापूर्वी आधार संलग्नित युजर आयडी तयार करुन अर्ज भरलेले आहेत त्यांनी पुन्हा नवीन नॉन आधार युजर आयडी तयार करु नये. नवीन नॉन आधार युजर आयडीवरुन अर्ज नुतनीकरण केल्यास व एका पेक्षा जास्त युजर आयडी तयार करुन अर्ज रद्द झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थी व महाविद्यालयांची राहील.

अर्ज भरण्याबाबत काही तांत्रिक अडचणी असल्यास आपण प्रवेशीत असणा-या महाविद्यालयाशी, तसेच संबंधित महाविद्यालयात सुरू करण्यात आलेल्या समान संधी केंद्रांशी संपर्क साधावा किंवा सदरच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या (Grievance/Suggestions) (तक्रार) या टॅबद्वारे आपली अडचण संकेतस्थळावर नोंदविण्यात यावी. विहीत मुदतीत कार्यालयास अर्ज प्राप्त न झाल्यास व विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहिल्यास त्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य यांची राहील व त्यास सामाजिक न्याय विभाग जबाबदार राहणार नाही. असे मा. डॉ. श्री प्रशांत नारनवरे, आयुक्त समाज कलयाण आयुक्तालय पुण यांनी सूचित केले आहे.

अमरावती विभागातील अमरावती/अकोला/यवतमाळ/बुलढाणा व वाशिम जिल्हयातील सर्व मागासवर्गीय विदयार्थ्यांनी विहीत मुदतीत अचूक अर्ज महाविद्यालयांकडे सादर करावेत महाविद्यालयांनी ते अर्ज वेळेतच सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्याकडे सादर करण्याचे आवाहन श्री. सुनिल वारे, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग अमरावती यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...