जप्त वाळूसाठ्यातून उपलब्ध वाळू वितरणाचे जिल्हाधिका-यांचे आदेश

 

आवास योजना लाभार्थ्यांसाठी वाळूघाट राखून ठेवण्याबाबत शासनाचे मार्गदर्शन मागविले

जप्त वाळूसाठ्यातून उपलब्ध वाळू वितरणाचे जिल्हाधिका-यांचे आदेश

अमरावती, दि. 24 : जिल्ह्यातील वाळूघाट अद्याप सुरू झालेले नसल्याने आवास योजनांतील घरकुल बांधकामासाठी वाळूघाट राखीव ठेवण्याबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. ते प्राप्त होताच वाळूघाट राखीव ठेवून आवास योजनांच्या लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून देण्यात येईल.  दरम्यान, जप्त वाळूसाठ्यातून व जलसंधारणाच्या कामातून उपलब्ध वाळूसाठ्यातून आर्थिक दुर्बल घटकांना पाच ब्रासपर्यंत वाळू विनामूल्य उपलब्ध करून देण्याचे निर्देश ‘एसडीओ’ व तहसीलदारांना देण्यात आले आहेत, असे प्र. जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी आज सांगितले.

प्रधानमंत्री आवास योजना व इतर राज्य पुरस्कृत आवास योजनेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील व्यक्तींना तहसीलदारांच्या लेखी पूर्वपरवानगीने विनामूल्य पाच ब्रास वाळू मिळण्याची तरतूद आहे. त्यासाठी वाळूघाट उपलब्ध व आरक्षित करण्यासाठी तहसीलदारांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. त्यानुसार शासनाकडूनही मार्गदर्शनही मागविण्यात आले आहे. हे मार्गदर्शन प्राप्त होताच पुढील कार्यवाही गतीने केली जाईल. त्याचप्रमाणे, जप्त वाळूसाठ्यातून, तसेच नदी, नाल्याचे रूंदीकरण, खोलीकरण आदी जलसंधारण कामांतून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील व्यक्तींना घरकुल बांधकामासाठी पाच ब्रास वाळू विनामूल्य उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.

00000

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती